Narayan Rane,Satisha Savant Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sindhudurg : बोलेरो गाडीचं कर्ज थकवणाऱ्यांना 101 नोटिसा पाठवणार

भाजपला जिल्हा बँकेवर एक हाती आपला झेंडा फडकावला

तुषार सावंत

कणकवली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Sindhudurg District Bank Election) आज झालेल्या मतमोजणी मध्ये 19 पैकी 11 जागांवर बहुमत मिळवत भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय करून प्रथमत भाजपला जिल्हा बँकेवर एक हाती आपला झेंडा फडकावला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी अखेर भाजपच्या (BJP)विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे. महाविकास आघाडीच्या तीन पक्षाच्या नेत्यांनी ताकद लावली असली तरी, दिग्गज संचालकांचा पराभव झाल्याने केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

महाविकास आघाडीच्या तीन पक्षाच्या नेत्यांनी ताकद लावली असली तरी, दिग्गज संचालकांचा पराभव झाल्याने केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान, आघाडी पॅनलचे प्रमुख सतीश सावंत (Satish Savant) यांनी निकालानंतर प्रतीक्रिया दिली आहे. ते म्हणाले, चांगली कामे करूनही बँकेमध्ये आमचा पराभव झाला आणि धनशक्तीचा विजय झाला. मात्र सर्वसाधारण सभेमध्ये या बँकेवर अंकुश ठेवण्याचे काम आम्ही आणि निवडून आलेले आमचे आठ मतदार ठेवतील. बँकेवरील राणे यांच्या कारभारावर लक्ष राहील असेही त्यांनी नमूद केले आहे .ज्यांनी बोलेरो गाडीचे कर्ज घेऊन थकीत ठेवले आहे त्यांना 101 नोटिसा बजावून याबाबत आम्ही पाठपुरावा करू. चांगले काम करून जर शेतकऱ्यांच्या हिताची बँक आमच्या ताब्यातून जात असेल तर ती मोठी शोकांतिका आहे. म्हणजे जिल्ह्यात यापुढे चांगले काम करण्याची गरज नाही केवळ धनशक्तीच्या आधारावरच लोक निवडून येतील असे मतही सावंत यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हा बँकेवर भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय झालेला आहे त्यातच मी समाधानी आहे असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli)यांनी व्यक्त केले. या बँकेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी मी नाराज नसून, माझा पक्ष या बँकेवर झेंडा फडकवत असेल तर मी निश्चितच समाधानी असेल. आमच्या पक्षातील सगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला फळ आले आहे त्यामुळे जिल्हा बँक आम्ही आमच्या ताब्यात मिळवू शकलो हा आमचा खरा विजय आहे असे मतही त्यांनी राजन तेली यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 2nd T20I: 'शुभमन पहिल्याच बॉलवर आऊट, त्यानंतर मी...' सूर्यकुमार टीम इंडियाच्या पराभवानंतर काय म्हणाला?

IND vs SA: तब्बल ७ वाईड अन् १३ चेंडूंची एक ओव्हर! अर्शदीपवर प्रचंड भडकला गौतम गंभीर; Video Viral

IND vs SA, 2nd T20I: तिलक वर्मा एकटा लढला, वादळी फिफ्टीही ठोकली; पण टीम इंडिया ऑलआऊट अन् द. आफ्रिकेचा मोठा विजय

Modi hosts Dinner for NDA MPs : मोदींकडून 'NDA' खासदारांसाठी पंतप्रधान निवासस्थानी विशेष भोजनाचे आयोजन

कांदा आता प्रतिक्विंटल सरासरी १५०० रुपये! गुरुवारी सोलापूर बाजार समितीत २०९ गाड्यांची आवक; एक महिन्यात ५० कोटींची उलाढाल

SCROLL FOR NEXT