Narayan Rane  esakal
महाराष्ट्र बातम्या

नारायण राणेंना पोलिसांची नोटीस, सिंधुदुर्गात घडामोडींना वेग

ओमकार वाबळे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचं सांगण्यात आलंय. नितेश राणे प्रकरणात ही नोटीस देण्यात आली आहे. (Police Notice to Narayan Rane) याशिवाय नितेश राणे यांचे स्विय्य सहाय्यक राकेश परब आणि वेंगुर्ला तालुका प्रमुख मनिष दळवी यांनाही नोटीसा धाडण्यात आल्या आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी नितेश राणे कुठे आहेत, यावर भाष्य केलं होतं. नितेशचा पत्ता सांगालयला मला मूर्ख समजता का, असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला होता. या वक्तव्यावरून राणेंना नितेश कुठे आहेत, याची माहिती असणार. याबद्दल पोलिसांना संशय आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या प्रकरणात नारायण राणेंना नोटीस देण्यात आली आहे. यानंतर नारायण राणे हजर राहणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय.

शिवसेनेच्या नेत्याला मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांना राज्य सरकार अटक करणार, अशी चर्चा असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच नितेश राणे यांच्यासाठी एवढे पोलीसबळ का लावले, असा प्रश्न उपस्थित केला. नितेश राणे कुठे आहेत, यावरही राणे बोलले. नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. (Narayan Rane) यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

मुंबईपासून गोव्यापर्यंत पोलिसांची फिल्डिंग?

अधिवेशनात व्हिप बजावल्यानंतरही नितेश राणे अधिवेशनात उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे ते कुठे आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. नितेश राणे दिल्लीला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यांचा फोनसुद्धा स्विच ऑफ असल्याचं समजते. आमदार नितेश राणे गोव्यात असल्याची चर्चा आहे. तर सिंधुदुर्ग आणि रायगड पोलिसांचे पथक गोव्यात दाखल झालं आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. नितेश राणेंची अटक टाळण्यासाठी नारायण राणे यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत.

नारायण राणेंना आलेली नोटीस

अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

नितेश राणे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावर काल (ता.28) न्यायालयात साडेतीन तास सुनावणी झाली. न्यायालयाकडून त्यांना तातडीने कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने तो वाढवून देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. परंतु, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेतली आहे. आता ही सुनावणी सुरू आहे.

हा तर सत्तेचा दुरुपयोग

सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गात सुडाचे राजकारण व दडपशाही सुरू केली आहे. कोणतीही खातरजमा न करता पोलिसांनी सुरू केलेले अटकसत्र तत्काळ थांबवावे. पोलिसांनी सरकारचे ऐकून सत्तेचा दुरुपयोग करू नये. भाजप कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकण्याचे न थांबल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला होता. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण...नितेश राणेंना अटक होणार?

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून ते अज्ञातवासात गेले आहेत. संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात कणकवली पोलीस कारवाईची तयारी करत आहेत. दरम्यान, त्याआधी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी दुपारी यावर सुनावणी होण्याची शक्यता होती. मात्र, आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्याआधी नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बंगल्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितेश राणे यांच्यासमोर कोणते कायदेशीर पर्याय आहेत याचीही चाचपणी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT