महाराष्ट्र बातम्या

आपली संस्कृती नव्याने दिसू लागली आहे ! 

अंकित काणे

सगळे दिवस सारखे नसतात, हा निसर्गाचाच नियम आहे. संकटाला खंबीरपणे सामोरं जाण्याची आपली परंपरा आहे, इतिहास आहे. थकू नका, वाकू नका, खचून जाऊ नका...उद्याची पहाट आपलीच असणार आहे. एकमेकांना सहकार्य करूया, हातात हात घालून पुढे जाऊया. आजपर्यंत आपण माझं माझं - तुझं तुझं असंच जगत होतो, या कोरोना ने मनं मोठी केली. मला तर विशेष वाटतंय, एखादा गरीब माणूस पण आमच्या अनाथालयात त्याला शक्‍य तितके धान्य आणून देतोय. त्याच्या देखील मनात 'देण्याची' भावना येते आहे हे किती आनंददायी आहे. आमची संस्कृती ओरबाडून घेण्याची नाहीये तर वाटून खाण्याची आहे. एक तीळ सात जणांत वाटून खायचे संस्कार आहेत आमच्यावर. त्याचीच आता जाणीव होऊ लागली आहे. माणुसकी आणि मानवतेचे अर्थ समजू लागले. माणूस स्वतःच्या भाकरीचा अर्धा तुकडा दुसऱ्याला देऊ लागला म्हणजेच संस्कृती नव्याने जागी होऊ लागली आहे, नव्याने दिसू लागली आहे. 

ना हम रहे अपने लिये, हमको सभी से गर्ज है... गुरुदेव यहा आशिष दे जो सोचनेका फर्ज है...! 

पण मला काळजी वाटते आहे ती, हातावर पोट असणाऱ्यांची. त्यांना चार घास खायला मिळाले पाहिजेत. त्यांची चूल पेटवू. पुण्य वाटून घेऊ. सगळं काही सरकार नाही करू शकत, आपणही हातभार लावू. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉक्‍टरांवर हल्ले होतायत, पोलिसांना मारहाण करण्याचे प्रयत्न होतायत हे चुकीचे आहे. ते आहेत म्हणून आपण शांतपणे आणि सुरक्षित जगू शकतोय. त्यांची लेकरं पण घरात वाट बघत असतील, त्यांच्याही घरच्यांना काळजी वाटत असेल याची आपल्याला जाणीव असली पाहिजे, आपल्यासाठी रस्त्यावर उभे राहून काम करतायत. त्यांच्या सूचना पाळा. घरात असलेल्या पुरुषांनी या काळात आपली बायको काय काय काम करते, किती कष्ट करते ते बघा, तिला मदत करा. ती आनंदी तर घर आनंदी. 

मी आयुष्यात पहिल्यांदाच इतका काळ घरात राहते आहे. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यात, गावात कार्यक्रम असतात. व्याख्यानं असतात त्यामुळे घरी निवांत राहिलेच नाही. पण आता मात्र वेळ मिळालाय. याचा उपयोग करायचं ठरवून मी माझं आत्मचरित्र लिहायला घेतलंय. 'होय, तरीही जगायचं...' हे नाव दिलंय आत्मचरित्राला. मी ही जगले तुम्हीही जगा. त्या आत्मचरित्रातून माझ्या आयुष्याचा प्रवास मांडायचा प्रयत्न करणार आहे. त्यातून उरलेला वेळ मी माझ्या लहान लेकरांबरोबर घालवते. माझ्याकडे लहान मुलं आहेत, तशाच गाई पण आहेत. माझी मुलं आणि गाई यांच्याबरोबर वेळ आनंदात जातो. 

सिंधूताई सकपाळ (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT