singer asha bhosle meets raj thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : आशा भोसलेंकडून राज ठाकरेंची विचारपूस, भेटीसाठी पोहोचल्या शीवतीर्थावर

मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे अधिक वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे अधिक वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील लीलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर अनेक दिग्गजांनी राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली आहे. दरम्यान, आज राज ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी जेष्ठ पार्श्वगायिका श्रीमती आशाताई भोसले यांनी शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. (singer asha bhosle meets raj thackeray)

राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे अधिक वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या चाचण्या करण्यासाठी राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते.

याआधीही राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, तेव्हा त्यांच्या शरीरात कोरोनाचे डेड सेल्स आढळून आले होते. यामुळे त्यांना ॲनेस्थेशिया म्हणजे भुलीचे इंजेक्शन देता येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ही माहिती देण्यात आली होती.

दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, सुमारे दोन ते तीन महिने राज ठाकरे यांना कुठलाही दौरा करता येणार नाही. या काही दिवसांत त्यांची विचारपूस करण्यासाठी राजकीय मंडळींनीही भेट घेतली आहे. मागील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतील होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT