solapur kegaon sinhagad sakal
महाराष्ट्र बातम्या

केगावच्या माळरानावर ‘सिंहगड’ने फुलविले अभियांत्रिकी शिक्षणाचे नंदनवन! सिव्हिल, मेकॅनिकल, ई ॲण्ड टीसी, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकलचे शिक्षण

केगावच्या माळरानावर सिंहगड शिक्षण संस्थेने २०१० साली सोलापूर शहर-जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सिंहगड अभियांत्रिकी शिक्षणाची सुरवात केली. ९० एकर परिसरात ‘आआयटी’च्या धर्तीवर ‘सिंहगड’ने याठिकाणी इमारती उभारल्या आहेत. त्यावेळी सुरवातीला ३६० विद्यार्थी होते, पण आता दरवर्षी १५०० विद्यार्थी येथून अभियंता होऊन बाहेर पडतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : केगावच्या माळरानावर सिंहगड शिक्षण संस्थेने २०१० साली सोलापूर शहर-जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सिंहगड अभियांत्रिकी शिक्षणाची सुरवात केली. ९० एकर परिसरात ‘आआयटी’च्या धर्तीवर ‘सिंहगड’ने याठिकाणी इमारती उभारल्या आहेत. त्यावेळी सुरवातीला ३६० विद्यार्थी होते, पण आता दरवर्षी १५०० विद्यार्थी येथून अभियंता होऊन बाहेर पडतात. दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट लॅब, सुसज ग्रंथालय, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचे समुपदेशन व जॉब प्लेसमेंट अशा या संस्थेच्या जमेच्या बाजू आहेत. संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले सर यांच्या प्रेरणेने संस्थेचे सहसचिव संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. शंकर नवले हे ११ वर्षांपासून याठिकाणी कार्यरत आहेत.

‘सकाळ’च्या ज्ञानवाटा उपक्रमात सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवले यांनी सोलापुरातील ‘सकाळ’ कार्यालयात येऊन संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली. तत्पूर्वी, सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. नवले म्हणाले, ‘राज्यात १९८३ पासून खासगी अभियांत्रिकी शिक्षणाला सुरवात झाली आणि त्यावेळी प्रा. एम. एन. नवले सरांनी सर्वात तरुण प्राचार्य म्हणून 10 वर्षे काम पाहिले. त्यानंतर त्यांनी १२ ऑगस्ट 1993 रोजी सिंहगड संस्थेची स्थापना करून विद्यार्थ्यांसाठी सुरवातीला तंत्रनिकेतनचे शिक्षण द्यायला सुरवात केली. २००४ साली सिंहगडने सोलापुर जिल्ह्यात पाऊल ठेवले. सध्या कमलापूर (ता. सांगोला), केगाव (सोलापूर) व कोर्टी (पंढरपूर) या तीन ठिकाणी ‘सिंहगड’च्या संस्था आहेत. केगाव येथील संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई अभ्यासक्रमानुसार (एलकेजी, युकेजी ते बारावी सायन्स पर्यंत) एक हजार आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात दीड हजारांहून अधिक विद्यार्थी. शिक्षण घेत आहेत’. २०१४ मध्ये श्री. संजय नवले हे कॅम्पस डायरेक्टर व डॉ. शंकर नवले हे प्राचार्य म्हणून पदभार घेतला आणि सोलापूर सिंहगड चा प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढतच राहिला. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब मिळायला हवा, अनेकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील संधी मिळावी, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी देशात, विदेशात चमकायला पाहिजेत, यासाठी त्यांचा अट्टाहास असतो.

कॉलेजला विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट संस्था असे पुरस्कार मिळाले आहेत. बंगळुरूचा नॅशनल ॲकेडमिक एक्सलन्स पुरस्कार देखील मिळाला. तसेच नॅक कडून सलग दोन वेळेस 'अ' श्रेणी प्राप्त झाली आहे. याशिवाय सांस्कृतिक महोत्सवात, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेतही या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विद्यार्थी हाच ब्रॅण्ड ॲम्बेसेडर मानून संस्थेची वाटचाल सुरू आहे.

केगावच्या सिंहगडमध्ये ‘हे’ अभ्यासक्रम

  • सिव्हिल इंजिनिअरिंग : (६० प्रवेश क्षमता)

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग : (१२० प्रवेश क्षमता)

  • ई ॲण्ड टीसी : (६० प्रवेश क्षमता)

  • कॉम्प्युटर सायन्स : (६० प्रवेश क्षमता)

  • इलेक्ट्रिकल : (६० प्रवेश क्षमता)

संस्थेविषयी ठळक बाबी...

  • प्रवेशानंतर महाविद्यालय सुरू होताच विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेशन प्रोजेक्ट (आवडीच्या विषयावर प्रकल्प तयार करणे) स्पर्धा घेतली जाते, त्यातून विद्यार्थ्यांच्या आवडी, कौशल्य समजण्यास मदत होते

  • महाविद्यालयाच्या ग्रंथालयात १४५०० पुस्तके, दरवर्षी त्यात वाढ, ४०० विद्यार्थ्यांचा रिडिंग हॉल स्वतंत्र

  • तज्ज्ञ प्राध्यापक, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही

  • सुसज्ज क्रीडांगण, जिमनॅशियम, दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव

  • राष्ट्रीय स्तरावरील नॅक कडून 'अ' मानांकन मानांकन,

  • ‘आआयसी’चे इनोव्हेशन सेल

  • मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅन्टिन, वाहतुकीसाठी स्वत:च्या बसगाड्या

  • ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल, प्लेसमेंटपूर्वी विद्यार्थ्यांना पूर्वतयारीचे धडे

‘टिचर-गार्डीयन’द्वारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष

प्रॉब्लेम ॲण्ड प्रोजेक्ट बेस्‌ड लर्निंगवर महाविद्यालयाचा भर आहे. कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचता यावे, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांना उत्तम शिक्षण घेता यावे, या हेतूने सिंहगड संस्थेतर्फे टिचर-गार्डीयन (शिक्षक-पालक) उपक्रम राबविला जातो. संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याचे मानून एका प्राध्यापकाकडे १५ ते २० विद्यार्थ्यांची जबाबदारी देण्यात येते. त्यातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अडचणी समजतात, योग्यवेळी त्या विद्यार्थ्यांना भविष्याची पायवाट घालून दिली जाते. त्यामुळे आपण कशासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतोय, याची जाणीव त्यांना होते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर चांगला होत असल्याचेही प्राचार्य डॉ. नवले यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरण फायदेशीर

पूर्वी ज्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्याने प्रवेश घेतला, त्यातूनच त्यांना शिक्षण पूर्ण करावे लागत होते. आता मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय घेऊन मायनर डिग्री देखील पूर्ण करता येणार आहे. एकापेक्षा जास्त विषयाचे ज्ञान त्यांना मिळेल. अनेक विद्यार्थ्यांना या धोरणाबद्दल फार माहिती नसते, त्यामुळे ‘सिंहगड’कडून विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती दिली जाते. त्या विषयांचे महत्त्व आणि भविष्यातील संधी, यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होते.

मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ

राज्य शासनाच्या निर्णयानुसार मुलींना सध्या मोफत शिक्षण दिले जात आहे. ईबीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, एससी, एसटी, एसबीसी, व्हीजेएनटी अशा सर्व प्रवगातील मुलींना शासनाच्या योजनेची दरवर्षी माहिती दिली जाते. मुलींना दरवर्षी शुल्क भरण्यासाठी टप्पे दिले जातात. आम्हीही संस्थेकडून होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना मदत करतो. अभियांत्रिकीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ‘गेट’ परीक्षेबद्दलही पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. प्लेसमेंट व रिसर्च जर्नल, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील आमच्याकडे पुस्तके असल्याचेही डॉ. नवले यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटवर सर्वाधिक भर

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना सुरू झाला तरीदेखील ‘ह्युमन कॅन नॉट बी रिप्लेस’, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे स्थान कायमच अमूल्य राहील. विद्यार्थी शिकतो नोकरीसाठी, त्यामुळे प्लेसमेंटच्या माध्यमातून किंवा विद्यार्थी स्वत:चा व्यवसाय, उद्योग सुरू करावेत यासाठी आम्ही नेहमीच विविध उपक्रम, मार्गदर्शन शिबिरांचे (स्टुडंट डेव्हलपमेंट ॲण्ड करिअर कौन्सिलिंग) आयोजन करतो. त्यामुळे दरवर्षी महाविद्यालयाचे प्रवेश हाऊसफुल्ल होतात.

- संजय नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Rada Gang: Reel च्या माध्यमातून दहशत माजवणाऱ्या राडा गँगला पोलिसांनी गुडघ्यावर आणलं | Sakal News

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Latest Marathi News Live Updates : पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यू

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

SCROLL FOR NEXT