schools

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

‘एसआयआर’ संपले, आता शिक्षकांना ‘एआय’ प्रशिक्षण! ‘एससीईआरटी’चे शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र; मुख्याध्यापक, शिक्षकांना ५० तासांच्या प्रशिक्षणाचे बंधन

मतदार पुनरीक्षणाचे काम १७ ऑगस्टला संपले. त्याच दिवशी इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवरील शिक्षकांना ५० तासांचे ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रशिक्षण पूर्ण करायचे असल्याचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) काढले आहे. ३० सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांना आता हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मतदार पुनरीक्षणाचे काम १७ ऑगस्टला संपले. त्याच दिवशी इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवरील शिक्षकांना ५० तासांचे ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रशिक्षण पूर्ण करायचे असल्याचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) काढले आहे. ३० सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांना आता हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.

इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना ‘एआय साथी फॉर एज्युकेटर्स’ हा ऑनलाइन कोर्स करावा लागणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत सर्वच शिक्षकांना नोंदणी करावी लागणार आहे. अजूनही लाखो शिक्षकांनी कोर्ससाठी नोंदणी केलेली नाही, दुसरीकडे नोंदणी करूनही अनेकांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही. त्यामुळे आता राहिलेल्या शिक्षकांनी ३१ ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी आणि ३० सप्टेंबरपूर्वी कोर्स पूर्ण करावा लागणार आहे.

कोर्ससाठी चार तासांचे ‘सीपीडी’ (प्रगतीशील विकास) प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे. तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना आवश्यक सूचना करून सर्व शिक्षकांची नोंदणी करून कोर्स वेळेत पूर्ण करून घ्यावे, असे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी काढले आहे. ते पत्र सर्व विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्राचार्य, महापालिकेचे प्रशासनाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. मुख्याध्यापकांनाही प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर एक प्रश्नपत्रिका येते, त्यातील उत्तरे सोडवून ती सबमिट केल्यावर लगेचच निकाल येतो. त्यानंतर संबंधित शिक्षकास प्रशिक्षण पूर्ण केल्याचे ऑनलाइन प्रमाणपत्र मिळते.

शिक्षकांनी मुदतीत नोंदणी करून कोर्स पूर्ण करावा

विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना ‘एआय’ची प्राथमिक माहिती असावी म्हणून पहिली ते बारावीच्या वर्गांवरील सर्व शिक्षकांसाठी हा कोर्स करावा लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पत्रानुसार शिक्षकांनी कोर्ससाठी मुदतीत नोंदणी करून कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.

- डॉ. इब्राहिम नदाफ, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर

३० तासांचे ऑनलाइन अन्‌ २० तासांचे ऑफलाइन प्रशिक्षण

इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गास शिकवणाऱ्या शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा लागणार आहे. शिक्षकांना ‘एआय’चा वापर सहजपणे करता यावा या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून सर्व शिक्षकांना ३० तास ऑनलाइन प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. २० तास प्रशिक्षण वर्षभरात ऑफलाइन घ्यावा लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती

  • प्रशिक्षणास अपेक्षित शिक्षक

  • २३,३६२

  • नोंदणी केलेले शिक्षक

  • ११,४७८

  • नोंदणी न केलेले शिक्षक

  • ११,८८४

  • नाव नोंदणीसाठी मुदत

  • ३० ऑगस्ट २०२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ‘नाना’ पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; साश्रू नयनांनी लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप

Dr. Neelam Gorhe : १२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सूचना

FDA Crime : विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृह बंद; ‘एफडीए’ची धडक कारवाई

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान - रामदास आठवले

Nana Patekar : अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT