sakal breaking solapur
महाराष्ट्र बातम्या

सहा पिस्टलसह ३५ जिवंत काडतूस जप्त; ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; अवैधरीत्या पिस्टल विकणाऱ्या अभियंत्यासह चौघे अटकेत

अभियंता अजित नवनाथ पाटोळे याच्यासह चौघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या देशी बनावटीचे पिस्टल विकताना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा पिस्टल व ३५ गोळ्या (जिवंत काडतूस) हस्तगत केल्या असून न्यायालयाने चौघांनाही रविवारपासून चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भातील काम पाहिलेला अभियंता अजित नवनाथ पाटोळे (रा. शेवरे, ता. माढा) याच्यासह चौघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या देशी बनावटीचे पिस्टल विकताना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा पिस्टल व ३५ गोळ्या (जिवंत काडतूस) हस्तगत केल्या असून न्यायालयाने चौघांनाही रविवारपासून चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

अभियंता म्हणून काम करणाऱ्या अजित पाटोळे याने पुढे जाऊन स्वत:चा ढाबा टाकला होता. त्याठिकाणी तो ऊसतोड टोळीप्रमुखाच्या संपर्कात आला. त्यानंतर पाटोळे हा मित्रासह तिघेजण ऊस टोळीचे कामगार आणायला धुळे जिल्ह्यात गेला. त्यावेळी मध्यप्रदेशातील बाँड्रीवरील उमटी गावात स्वस्तात देशी बनावटीचे पिस्टल मिळतात, असे एकाने सांगितले. त्यांनी तेथून सहा पिस्टल व ३५ गोळ्या विकत घेतल्या. २० हजार रुपयाला एक पिस्टल त्यांनी विकत घेतले. त्यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी आकाश मधुकर चव्हाण (रा. आढेगाव, ता. माढा) याला तीन तर कर्णवीर उर्फ अतुल गपाटे (रा. भिमा नगर, ता. माढा) याला एक पिस्टल विकले. उर्वरित दोन पिस्टल अजित पाटोळे व बिपिन तानाजी जाधव (रा. रामोशी गल्ली टेंभुर्णी, ता. माढा) या दोघांकडेच होते. पिस्टल विक्रीसाठी दोघेजण टेंभुर्णीजवळील सागर बार परिसरात येणार असल्याची खबर सहायक फौजदार ख्वाजा मुजावर यांना मिळाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली एक पथक रवाना झाले. त्यावेळी पाटोळे व त्याचा मित्र त्या परिसरात बसल्याचे दिसले.

पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक श्री. शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार नारायण गोलेकर, ख्वाजा मुजावर, पोलिस हवालदार श्री. गाडे, मोहन मन्सावाले, पोलिस नाईक अक्षय दळवी, गायकवाड, अक्षय डोंगरे, चालक शेख यांनी पार पाडली. पोलिसांनी आता ज्याठिकाणाहून पिस्टल विकत घेतले त्याठिकाणी पथक रवाना केले आहे.

पोलिसांना पाहताच पिस्टलवर हात, तेवढ्यात...

साध्या वेशातील पोलिस दोघांच्या दिशेने येत असताना संशयित दोघे कंबरेचे गोळ्या भरलेले पिस्टल काढण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर व अक्षय डोंगरे यांनी मिठी मारून त्या दोघांना पकडले. त्यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता, अनोळखी व्यक्ती कोण येत आहेत या भीतीतून पिस्टल काढत होतो, असे त्यांनी सांगितले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

२२ दिवसांपूर्वी उद्घाटन, एक्सप्रेसवे खचला; पॅचवर्क सुकवण्यासाठी लावले १० पंखे, VIDEO VIRAL

Asaram Bapu Bail Rejected : आसाराम बापूंना सुप्रीम कोर्टाचा झटका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, नेमकं कारण काय?

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये मोठे बदल; '@all' टॅगसह आले ३ नवीन धमाकेदार फीचर्स!

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT