fertilizer fertilizer
महाराष्ट्र बातम्या

...तर खत-बियाणे दुकानांचे परवाने रद्द! शेतकऱ्यांना लिंकिंगचा आग्रह, ज्यादा दराने व मुदतबाह्य खतविक्री नकोच; शेतकऱ्यांनी ‘हा’ क्रमांक जपून ठेवावा

शेतकऱ्यांची खते, बियाणे, औषधे खरेदीत फसवणूक होऊ नये म्हणून भरारी पथके नेमली आहेत. त्यांच्यामार्फत मुदतबाह्य खते-औषधे व बियाणे विक्री, ज्यादा दराने विक्री, खतासोबत लिंकिंगचा आग्रह, खते असूनही नाहीत म्हणणे, अशा बाबींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खते, बियाणे, औषधे खरेदीत फसवणूक होऊ नये म्हणून कृषी अधीक्षकांनी १३ भरारी पथके नेमली आहेत. त्यांच्यामार्फत मुदतबाह्य खते-औषधे व बियाणे विक्री होणार नाही, ज्यादा दराने त्याची विक्री, खतासोबत लिंकिंगचा आग्रह, खते असूनही नाहीत म्हणून शेतकऱ्यांना परत पाठविणे, अशा बाबींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

मृग नक्षत्राच्या सुरवातीला जिल्हाभरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीयोग्य ओल झाली आहे. यंदा जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी होईल, असा अंदाज आहे. सोयाबीन, उडीद पेरणी सध्या सुरू झाली आहे. शेतकरी पेरणीसाठी बियाणे, खते खरेदी करीत आहेत. पण, मागील अनुभव पहाता शेतकऱ्यांची खते- बियाणे खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता आहे.

दुष्काळाच्या संकटाचा सामना करून खरीप पिकांवर आशादायी असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. या भरारी पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रांना अचानक भेटी देऊन त्यांच्याकडील खते-बियाणे व औषध साठ्यांची तपासणी केली जाणार आहे. विक्रेत्यांकडील ऑनलाइन खरेदी-विक्री व दुकानांमधील साठा, यात तफावत आढळल्यास संबंधिताचा परवाना निलंबीत किंवा कायमचा रद्द होवू शकतो, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी पावती व थोडे बियाणे जपून ठेवावेत

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खते, बियाणे व औषधे खरेदी करतेवेळी फसवणूक होवू नये, त्यांना खते घेताना कोणीही लिंकिंग खतांचा आग्रह करू नये, दुकानात खते असतानाही नाहीत म्हणून सांगणे, खते ज्यादा दराने विक्री करणे, मुदतबाह्य खते विक्री करणे असे प्रकार होवू नयेत म्हणून यंदा १३ भरारी पथके नेमली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केल्यावर पावती घ्यावी, काही बियाणे राखून ठेवावे, पिशवी खालून फोडावी, जेणेकरून त्यांना बियाणात फसवणूक झाल्यास दाद मागता येईल, असेही कृषी अधीक्षक श्री. गवसाने यांनी सांगितले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या खते-बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

शेतकऱ्यांनी ‘हा’ क्रमांक जपून ठेवावा

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी ७२१९२८६९२८ हा व्हॉट्‌सॲप क्रमांक देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT