Chagan Bhujbal  
महाराष्ट्र बातम्या

ब्राह्मणांचा एवढा द्वेष तर फडणवीसांसोबत सत्तेत का? काकासाहेब कुलकर्णींचा भुजबळ यांना सवाल

रवींद्र देशमुख

Mumbai News- सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजामधील नावांबाबत केलेल्या विधानामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. आता भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. आता काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बाळासाहेब कुलकर्णी यांनी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले की, छगन भुजबळ महाराष्ट्रातला कमी बुद्धीचा माणूस आहे, ज्या नावाने त्यांची दुकानदारी सुरू आहे, त्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे फक्त नाव घ्यायचं. परंतु त्यांचे साहित्य वाचायचे नाही, अशी त्यांची स्थिती आहे.

छगन भुजबळ चुकीचा इतिहास सांगत आहेत, सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या चरित्रात काव्य फुले नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी शाळेला सरस्वतीचा दरबार असे उद्गार काढले होते, असा दावा कुलकर्णी यांनी केला. सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेलं साहित्य नाकारायच का? छगन भुजबळ यांचा अभ्यास कमी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा किती अभ्यास आहे, त्यांची डिग्री काय याचा शोध घेण्याची वेळ आल्याचं कुलकर्णी यांनी नमूद केलं.

दरम्यान त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरचं शंकर पार्वतीचा फोटो आहे, सावित्रीबाई फुले यांनी शंकरावर कविता केली आहे. फुले कुटुंबीयांचं साहित्य नाकारण्याचं पाप छगन भुजबळ करत आहेत. त्यामुळे मी त्यांचा धिक्कार करतो. भुजबळांचा ज्या पद्धतीने सावित्रीमाई फुले, महात्मा फुले यांच्याविषयीचा अभ्यास कमी आहे. त्याच पद्धतीने ब्राह्मण समाजाबाबतचा अभ्यास कमी आहे.

दरम्यान माझा प्रश्न आहे, की छगन भुजबळ यांना ब्राह्मणांचा एवढा द्वेष होता तर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात. आपण त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं देवेंद्रजी आपण ब्राह्मण आहात मी तुमच्या शेजारी बसणार नाही. परंतु दुर्दैवाने सत्तेसमोर ते लाचार आहेत. भुजबळांना महाराष्ट्रातील सर्वात कमी बुद्धीचा माणूस, कमी शैक्षणिक पात्रेचा माणूस, म्हणलं तरी वावग ठरणार नाही, असंही कुलकर्णी यांनी नमूद केलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT