Sharad Pawar Supriya Sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

Baramati Politics: बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उतरणार ‘ही’ महिला उमेदवार

'बारामती मतदारसंघात भाजपा आणि एकनाथ शिंदेंनी विचार केल्यास मी निवडणूक लढवणार'

अंकिता खाणे (Ankita Khane)

बिग बॉस फेम आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आता राजकारणात उतरणार असल्याचं दिसून येत आहे. तृप्ती देसाई यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. 15 वर्षे बारामतीत घराणेशाहीच सुरु आहे. सुप्रिया सुळे यांनी कधीच कार्यकर्त्यांचा विचार केला नाही असं तृप्ती देसाई यांनी म्हंटलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात जनतेला बदल हवा आहे. तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई असणार आहे असंही तृप्ती देसाई यांनी म्हंटलं आहे. तृप्ती देसाई यांच्या या भूमिकेमुळे त्या भाजपात प्रवेश करणार का ? या चर्चांना आता उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार तृप्ती देसाई असणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. दुसरीकडे आम आदमी पार्टीकडूनही तृप्ती देसाई यांना पक्षात येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून आपण इच्छूक असल्याचे सांगत त्यांनी घराणेशाहीच्या विषयावरून पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. बारामती मतदारसंघात घराणेशाहीचं राजकारण असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून आपण इच्छूक असल्याचे सांगत आपल्याला आम आदमी पक्षाकडूनही ऑफर असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगलं असल्यामुळे आता भाजपलाही लोकांची पसंदी असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आपण बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून आम आदमी पक्षाकडूनही मला ऑफर आली आहे असंही तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षानं जर मला संधी दिल्यास मी ती ऑफर नाकारणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT