Solapur ZP

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर : झेडपीच्या 68 जागांसाठी 153 तर पंचायत समितीसाठी 265 उमेदवारांचे अर्ज; 1396 जणांनी नेले अर्ज; अर्ज भरणे व ‘बी’ फॉर्म देण्यासाठी आज दुपारी 3 पर्यंतच वेळ

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी जिल्ह्यातील १५३ उमेदवारांनी १५७ अर्ज भरले आहेत. तर ११ पंचायत समित्यांमधील १३६ सदस्यांसाठी २६५ व्यक्तींनी २६८ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या (मंगळवारी) दुपारी तीन वाजेपर्यंतच वेळ असणार आहे. या वेळेपूर्वी राजकीय पक्षांकडून उमेदवारी दाखल केलेल्यांना ‘बी’ फॉर्म द्यावा लागणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी जिल्ह्यातील १५३ उमेदवारांनी १५७ अर्ज भरले आहेत. तर ११ पंचायत समित्यांमधील १३६ सदस्यांसाठी २६५ व्यक्तींनी २६८ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या (मंगळवारी) दुपारी तीन वाजेपर्यंतच वेळ असणार आहे. या वेळेपूर्वी राजकीय पक्षांकडून उमेदवारी दाखल केलेल्यांना ‘बी’ फॉर्म द्यावा लागणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी एकूण २४ लाख ५९ हजार २२७ मतदार आहेत. त्यात ११ लाख ८२ हजारांवर महिला मतदार आहेत. जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी इच्छुकांची संख्या एक हजारांवर असून पंचायत समित्यांसाठीही तेवढेच इच्छुक आहेत. मंगळवारी (ता. २०) तब्बल १३९६ इच्छुकांनी अर्ज नेले असून अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. या गर्दीत उमेदवारी अर्ज भरलेल्या राजकीय पक्षांच्या उमदेवारांना ‘बी’ फॉर्म देखील वेळेत जमा करावा लागणार आहे.

महापालिकेतील अनुभव पाहाता उमेदवारी अर्ज भरलेल्या अनेकांना ‘बी’ फॉर्मची चिंता सतावू लागली आहे. अनेकांनी पक्षाकडून ‘बी’ फॉर्म न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी ठेवून अपक्ष देखील अर्ज भरले आहेत. गुरुवारी (ता. २२) उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर चिन्हवाटपानंतर उमेदवारांना ४ फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम...

  • अर्ज भरणे : २१ जानेवारी (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)

  • अर्जांची छाननी : २२ जानेवारी

  • अर्ज माघार : २३ ते २७ जानेवारीपर्यंत (दुपारी तीनपर्यंत)

  • चिन्ह वाटप : २७ जानेवारी

  • मतदान : ५ फेब्रुवारी

दुपारी तीनपूर्वी द्यावा लागेल ‘बी’ फॉर्म

राजकीय पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना उद्या (बुधवारी) दुपारी तीन वाजण्यापूर्वी पक्षाचा ‘बी’ फॉर्म भरून द्यावाच लागणार आहे. ज्यांचा वेळेत ‘बी’ फॉर्म येणार नाही, त्यांची उमेदवारी अपक्ष मानली जाणार आहे. अर्ज भरताना राजकीय पक्षाचा उमेदवार असो की अपक्ष उमेदवार, यांना एकच सूचक लागतो. पूर्वी राजकीय पक्षाला एक आणि अपक्षाला पाच सूचक लागत होते. ही अट राज्य निवडणूक आयोगाने काढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Pension Yojana : मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! अटल पेन्शन योजना २०३१ पर्यंत वाढवली; लाखो लोकांना मिळणार पेन्शन हमी

BMC: विरोधी पक्षात ३० वर्षांनी बदल! काँग्रेसचे पद जाणार; ठाकरे गट विरोधी पक्षनेत्याची डरकाळी फोडणार

'रुबाब'च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक

Raigad Video : 352 वर्षांपूर्वी कसे झालेले 'रायगड'चे बांधकाम? शिवरायांच्या काळातले अस्सल चित्र डोळ्यासमोर उभा करणारा AI व्हिडिओ व्हायरल

BMCच्या शाळांमधील सीबीएसईची पहिली तुकडी देणार दहावीची परीक्षा, ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT