advocate solapur
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर बार असोसिएशन निवडणूक! २० जुलैपूर्वी मिळणार नवा अध्यक्ष; ५ जुलैला उच्च न्यायालयाचे ३ न्यायमुर्ती सोलापुरात, ६ जुलैपासून निवडणुकीची रणधुमाळी

सोलापूर बार असोसिएशनची यंदाची निवडणूक ६ ते २० जुलैदरम्यान पार पडण्याची शक्यता असून, त्याआधी जूनअखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. सुमारे १६०० ते १८०० मतदार असलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र फताटे आणि ॲड. संतोष पाटील यांची नावे सध्या चर्चेत असून, निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनची यंदाची निवडणूक ६ ते २० जुलैदरम्यान पार पडण्याची शक्यता असून, त्याआधी जूनअखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. सुमारे १६०० ते १८०० मतदार असलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र फताटे आणि ॲड. संतोष पाटील यांची नावे सध्या चर्चेत असून, निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील वर्षी १६ जून रोजी निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. १८ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती, तर ३० जून रोजी मतदान पार पडले होते. त्या निवडणुकीत ॲड. बाबासाहेब जाधव यांनी विजय मिळविला होता.

सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य असलेले आणि जिल्हा न्यायालयात वकिली करणारे वकील या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतात. यंदा १६०० ते १८०० वकील मतदार असण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच संपर्क आणि भेटीगाठी वाढविल्याचे चित्र आहे.

ॲड. राजेंद्र फताटे यांनी यापूर्वीही बार असोसिएशनची निवडणूक लढविली आहे. यंदा त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा ॲड. संतोष पाटील यांना मिळू शकतो, अशीही वर्तुळात चर्चा आहे. मात्र, अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून २० जुलैपूर्वी नव्या अध्यक्षाची निवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

कार्यक्रमानंतर निवडणुकीची रणधुमाळी

सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांसाठी ५ जुलै रोजी कायदेविषयक चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यानंतर पुढील १५ दिवसांत सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक पार पडेल.

- ॲड. बाबासाहेब जाधव, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन

५ जुलैला हुतात्मा स्मृती मंदिरात कायदेविषयक चर्चासत्र

सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने ५ जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश ॲड. भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT