solapur Municipal Corporation

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या उमेदवारांचा ७०० रिक्षांमधून प्रचार! दररोज १२०० ते १६०० रुपयांचे भाडे; ७ दिवसांत प्रचारातून रिक्षावाल्यांना मिळणार ६० लाख रुपये, वाचा...

सध्या सोलापूर शहरात सुमारे ४५० रिक्षा प्रचाराच्या मैदानात उतरल्या असून, आणखी २५० रिक्षाचालक परवानगी मिळविण्यासाठी नॉर्थकोर्ट मैदानावर रांगेत उभे आहेत. प्रत्येक रिक्षासाठी उमेदवारांकडून दररोज १२०० ते १६०० रुपयांपर्यंत भाडे दिले जात आहे. ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का…’ अशा घोषवाक्यांसह स्पीकर लावलेल्या रिक्षा शहरातील गल्लीबोळातून फिरत असून, मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांकडून प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असून, आपले नाव, पक्षचिन्ह मतदारांच्या लक्षात राहावे यासाठी प्रचारासाठी रिक्षांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. सध्या सोलापूर शहरात सुमारे ४५० रिक्षा प्रचाराच्या मैदानात उतरल्या असून, आणखी २५० रिक्षाचालक परवानगी मिळविण्यासाठी नॉर्थकोर्ट मैदानावर रांगेत उभे आहेत. प्रत्येक रिक्षासाठी उमेदवारांकडून दररोज १२०० ते १६०० रुपयांपर्यंत भाडे दिले जात आहे. ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का…’ अशा घोषवाक्यांसह स्पीकर लावलेल्या रिक्षा शहरातील गल्लीबोळातून फिरत असून, मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रिक्षा प्रचारामुळे शहराचे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. दुसरीकडे माकप, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्रितपणे लढत आहे. एमआयएम स्वबळावर असून अपक्षांची संख्या २०० हून अधिक आहे. सध्या शहरातील कोणत्याही नगरात, बाजारपेठेत, रस्त्यांवर गेला तर त्याठिकाणी प्रचाराच्या रिक्षा, उमेदवारांचे बॅनर दिसतातच. उमेदवार दररोज रिक्षावाल्याला एक वेळचे जेवण व चहा-नाष्टा देत आहेत. प्रत्येक रिक्षाला दररोज कोणत्या भागात फिरायचे, कोठे थांबायचे हे ठरवून दिले जाते. रिक्षासमवेत उमेदवाराचा एक व्यक्ती फिरतो. आपल्या प्रभागातील छोटी छोटी गल्लीबोळं उमेदवाराला देखील माहिती नसतात, ते रिक्षावाल्यांना माहिती असतात.

अनेक भागातील अरुंद रस्त्यांमुळे मोठी वाहने तेथे जात नाहीत. त्यामुळे सध्या रिक्षा प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरत आहे. दररोज दिवसभर प्रवाशांच्या शोधात वणवण फिरणाऱ्या रिक्षावाल्यांसाठी निवडणुकीच्या प्रचाराचा काळ दिवाळी उत्सवापेक्षा कमी नाही. सात दिवस प्रचारासाठी फिरणाऱ्या रिक्षावाल्यांना तब्बल ६० लाख रुपयांचे भाडे मिळणार असून आरटीओला साडेतीन लाख रुपयांचे शुल्क मिळणार आहे.

आरटीओचे शुल्क अन्‌ भाडे असे...

  • रिक्षा

  • आरटीओ शुल्क : ५०० रुपये

  • दररोजचे भाडे : १२०० ते १५०० रुपये

  • -------------------------------------------------------

  • कॅब किंवा चारचाकी

  • आरटीओ शुल्क : १००० रुपये

  • दररोजचे भाडे : १५०० ते २५०० रुपये

  • --------------------------------------------------------

  • ‘ट्रान्सपोर्ट’ची वाहने

  • आरटीओ शुल्क : २००० रुपये

  • दररोजचे भाडे : २५०० ते ३५०० रुपये

भोंग्यांना परवानगीचे बंधन; बाईक रॅलीला नाही परवानगी

उमेदवारांनी प्रचारासाठी लावलेल्या वाहनांना महापालिकेतील ‘एक खिडकी’मधून परवानगी दिली जात आहे. पण, मनुष्यबळ कमी असल्याने रिक्षावाल्यांना तासन्‌तास त्याठिकाणी थांबून राहावे लागत आहे. दरम्यान, रिक्षांवरील भोंग्यांसाठी स्थानिक पोलिसांकडे जाऊन परवानगी घ्यावी लागत आहे. याशिवाय उमेदवारास पदयात्रा किंवा कॉर्नर सभा घ्यायची असल्यास त्यासाठी देखील पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे. बाईक रॅलीसाठी मात्र परवानगी नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT