MD Drugs

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहर पोलिसांनीच टाकला डाव अन्‌ ‘एमडी’ ड्रग विक्रीस आलेले दोघे अटकेत! पोलिसांचे व्हॅन पाहून दोघेही पळाले, पण वाटेत गाडीच बंद पडली अन्‌...

मुंबईतून पुणेमार्गे ४६ ग्रॅम एमडी ड्रग्ज घेऊन सोलापूर शहरात आलेल्या दोघांना जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (ता. २३) त्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची (२६ एप्रिलपर्यंत) पोलिस कोठडी ठोठावली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मुंबईतून पुणेमार्गे ४६ ग्रॅम एमडी ड्रग्ज घेऊन सोलापूर शहरात आलेल्या दोघांना जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (ता. २३) त्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची (२६ एप्रिलपर्यंत) पोलिस कोठडी ठोठावली आहे. सुफियान फुलारी, तौफिक सय्यद अशी संशयितांची नावे आहेत. ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोघांना पकडण्यासाठी जेलरोड पोलिसांनीच डाव टाकला होता. त्यात दोघेही सहजपणे अडकले.

सोलापूर शहरातील तरुणांना त्यांच्या मागणीनुसार काही तरुण मुंबई, पुण्यातून एमडी ड्रग्ज आणून देतात, अशी माहिती सोलापूर शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी डाव रचला. त्यानुसार सुफियान व तौफिक चारचाकी गाडी घेऊन ‘एमडी’ ड्रग्ज घेऊन पुण्यातून सोलापूरच्या दिशेने निघाले. ग्रामीण पोलिसांची हद्द सहजपणे पार करीत दोघेही सोलापूर शहरात आले. ज्याने ड्रग्जची मागणी केली होती, त्याने दोघांनाही विजापूर वेशीत बोलावून घेतले. सुफियान व तौफिक चारचाकी घेऊन बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विजापूर वेशीत आले. सुरवातीला दोघांनीही आजूबाजूचा अंदाज घेतला. एकजण गाडीच्या स्टिअरिंगवर बसूनच होता. त्यावेळी त्यांनी परिसरात पोलिसांच्या दोन गाड्या पाहिल्या आणि त्यांना संशय आला. त्यावेळी त्यांनी चारचाकी रूपाभवानी मंदिरमार्गे तुळजापूरच्या दिशेने घेतली.

जेलरोड पोलिसांची दोन पथके त्यांचा पाठलाग करीत होते, पण तामलवाडीच्या टोल नाक्याजवळ त्यांची गाडी बंद पडली. गाडीतून उतरून दोघेही पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्या चारचाकीसह एमडी ड्रग्ज असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत.

‘जेलरोड’चे पथक मुंबईला रवाना

जेलरोड पोलिसांनी एमडी ड्रग्ज घेऊन आलेल्या सुफियान फुलारी, तौफिक सय्यद यांना अटक केली आहे. त्यातील तौफिक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर एमडी ड्रग्जप्रकरणी पुण्यात पूर्वीचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्याकडील तपासात मुंबई कनेक्शन समोर आले आहे. पुढील तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT