solapur city police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सुपर ओव्हरमध्ये जिंकला सोलापूर शहर पोलिस अधिकाऱ्यांनी सामना! एका पोलिस उपायुक्तांनी मारले 2 चौकार, दुसऱ्यांनी घेतला उत्कृष्ट झेल, ‘हे’ मॅन ऑफ दि मॅच, वाचा...

सोलापुरातील रेल्वे मैदानावर आज (रविवारी) सोलापूर रेल्वे अधिकारी आणि शहर पोलिस अधिकाऱ्यांच्या संघात १५ षटकांचा क्रिकेट सामना पार पडला. हा सामना रोमांचक झाला, सुपर ओव्हरमध्ये शहर पोलिस अधिकाऱ्यांच्या संघाने नऊ धावांनी हा सामना जिंकला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील रेल्वे मैदानावर आज (रविवारी) सोलापूर रेल्वे अधिकारी आणि शहर पोलिस अधिकाऱ्यांच्या संघात १५ षटकांचा क्रिकेट सामना पार पडला. हा सामना रोमांचक झाला, सुपर ओव्हरमध्ये शहर पोलिस अधिकाऱ्यांच्या संघाने नऊ धावांनी हा सामना जिंकला.

महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर रिलॅक्स झालेल्या सोलापूर शहर पोलिस अधिकाऱ्यांचा रविवारी रेल्वे अधिकारी संघासोबत क्रिकेट सामना झाला. टॉस जिंकून रेल्वे अधिकारी संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली. १५ षटकात १०७ धावा केल्या. १०८ धावांचे आव्हान घेऊन सोलापूर शहर पोलिस अधिकाऱ्यांचा संघ मैदानात उतरला. पोलिस अधिकाऱ्यांच्या संघांनी देखील रेल्वे संघाएवढ्याच धावा केल्या. सामना बरोबरीत तथा अर्निणीत राहिला. त्यानंतर सुपर ओव्हर टाकावी लागली. सर्वांना रेल्वे संघ जिंकेल, असे वाटत होते. सोलापूर शहर पोलिस अधिकारी संघाकडून पोलिस उपनिरीक्षक संतोष येळे, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे मैदानात उतरले.

चार चेंडूत पाच धावा केल्या आणि पाचव्या चेंडूत श्री. काळे बाद झाले. त्यानंतर मैदानात उतरले सहायक पोलिस निरीक्षक नीलेश सोनवणे. त्यांनी शेवटच्या चेंडूवर लॉंग ऑनच्या दिशेने उत्तुंग षटकार ठोकला. रेल्वे अधिकारी संघाला सामना जिंकण्यासाठी एका षटकात ११ धावांची गरज होती. पण, त्यांचे दोन्ही खेळाडू अवघ्या दोनच धावा करू शकले. यावेळी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुजित मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.

दोन्ही पोलिस उपायुक्तांची चमकदार कामगिरी

सोलापूर शहर पोलिस अधिकारी संघाचे नेतृत्व पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्याकडे होते. त्यांनी फलंदाजी करताना दोन चौकार मारले. तर क्षेत्ररक्षण करताना पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी उत्कृष्ट झेल टिपला.

एपीआय सोनवणे ‘मॅन ऑफ दि मॅच’

या क्रिकेट सामन्यात पोलिस उपनिरीक्षक मनोज मोरे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांनीही फलंदाजी चांगली केली. फलंदाजीत सर्वाधिक धावा करणारे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश सोनवणे ‘मॅन ऑफ दि मॅच’ ठरले. त्यांनी उत्कृष्टपणे यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर, स्वत:ची चूक झाकण्यासाठी निरपराधाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; हायकोर्टानं फटकारलं

कराड तालुका हादरला! चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार;संशयिताकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची धमकी, चौघांवर गुन्हा..

Latest Marathi news Update : BCCIचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचं निधन

Padma Awards 2026 : पद्म पुरस्कार जाहीर: महिलांचा सन्मान, परदेशी नागरिकांचा गौरव; धर्मेंद्र, अच्युतानंदन यांना पद्मविभूषण

Republic Day 2026 : देशातील ४१ गावं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच साजरा करणार प्रजासत्ताक दिन, कारणही आहे खास

SCROLL FOR NEXT