Crime News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News: '...म्हणून मी जगाचा निरोप घेतोय', सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या

तीनवेळा परीक्षा देऊनही उत्तीर्ण होत नसल्याचे कारण; चिठ्ठीतून मागितली आई-वडिलांची माफी

अंकिता खाणे (Ankita Khane)

‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या आकाशने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात तो म्हणतो, ‘मला डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही, त्याबद्दल आई-बाबांनी मला माफ करावे. मला परीक्षेतील अनुत्तीर्ण विषय काढणे शक्य होईना, त्यामुळे मी जगाचा निरोप घेतोय.

आई दीदीची काळजी घे, तिला नीट सांभाळ, माझ्या मृत्यूची बातमी आई-बाबांना सांगू नका, मामाला सांगा. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका’ असा मजकूर आकाशने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्याची माहिती फौजदार चावडी पोलिसांनी दिली.(Latest Marathi News)

सोलापूर, येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आकाश संतोष जोगदंड (रा. चौसाळा, जि. बीड) याने आसार मैदानाजवळील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (ता. ५) ही बाब उघडकीस आली. तीनवेळा परीक्षा देऊनही ‘एमबीबीएस’च्या पहिल्याच वर्गातील विषय निघत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.(Latest Marathi News)

दरम्यान, बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील आकाशने २०२० मध्ये डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याने आतापर्यंत तीनवेळा परीक्षा दिली, पण आकाशला प्रथम वर्षाच्या सर्व विषयांत उत्तीर्ण होता आले नव्हते. त्यामुळे तो नेहमीच तणावात असायचा. (Latest Marathi News)

उन्हाळा सुट्यांमुळे तो गावी गेला होता. चार दिवसांपूर्वी तो परीक्षेच्या निमित्ताने सोलापुरात आला होता. त्याने परीक्षा संपेपर्यंत आसार मैदानाजवळील लॉजच्या पहिल्या मजल्यावरील खोली भाड्याने घेतली होती. त्याला मागील बॅकलॉग आणि आता नव्या विषयात उत्तीर्ण होणे आव्हानात्मक वाटत होते.

त्या तणावातूनच त्याने बाजारातून दोरी विकत आणून रविवारी (ता. ४) मध्यरात्री गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. आतून बंद असलेला दरवाजा पोलिसांनी तोडला आणि आत प्रवेश केला. त्यावेळी आकाशचा मृतदेह खोलीतील पंख्याजवळील हुकाला लटकत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. त्याचे कुटुंबीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल होताच, सर्वांनीच आकाशचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला होता. दरम्यान, फौजदार चावडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT