Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: पांडुरंगाच्या आशीवार्दानेच करेक्ट कार्यक्रम केला; फडणवीसांचं विधान

संतोष कानडे

सोलापूरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मंगळवेढा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी सत्तास्थापनेवेळी करेक्ट कार्यक्रम केल्याचं सांगितलं. शिवाय यासाठी आपल्याला पांडुरंगाचे आशीर्वाद मिळाल्याचंही नमूद केलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते पंढरपूर येथे शासकीय कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) महापूजा संपन्न झाली. त्यानंतर फडणवीस यांनी मंगळवेढा येथील कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या ७ लाख शेतकऱ्यांना एका क्लिकवर ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलेले आहे. आणखी १५ लाख शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. मागच्या सरकारने फक्त घोषणा केली. मात्र निर्णय घेतला नव्हता. हे सरकार येत्या काळात नैसर्गिक शेतीसाठी उपक्रम राबवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

मंगळवेढा उपसा सिंचन प्रकल्पाबद्दल बोलतांना फडणवीस म्हणाले, २४ गावांना पाणी देणारा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मिटणार आहे. मागच्या सरकारने यामध्ये काहीही केलं नाही. परंतु आता नवीन दरसुचीप्रमाणे टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. सगळ्या मान्यता आणि ठरावही घेतलेले आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण करु, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

''आम्ही करेक्ट कार्यक्रम केला आणि पांडूरंगाच्या आशीवार्दाने हे सरकार आलं. त्यामुळे कामे अडणार नाहीत'' असं फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT