मुंबई- सोलापुरचे नवे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये शाई फेक करण्यात आल्याची घटना घडली होती. कंत्राटी भरतीच्या विरोधात त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. याआधी पिंपरीमध्ये त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. या मुद्द्यावरुन चंद्रकात पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे आठ शर्ट कायम असतात. त्यामुळे मी शाईफेक झाल्यास तयारच आहे, असं ते म्हणाले आहेत.
आज मी खूपच सर्वसामान्य नागरिकांना भेटलो.अजूनही कोणी असेल तर मी भेटायला तयार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घेतली आहे. काही होऊ नये म्हणून ते काळजी घेत आहेत. जे व्हायचं आहे ते चुकत नाही. आणि मी कशासाठीही तयार असतो. माझ्या बॅगमध्ये आठ शर्ट असतात. शाईफेक केली की मी लगेच दुसरा शर्ट घालतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दोन वेळा माझ्यावर शाईफेक करण्यात आली होती. दोन्ही वेळा मी तिसऱ्या मिनिटाला नवीन शर्ट घालून बाहेर पडलो. सोलापूरमध्ये शाईफेकीची घटना घडल्यानंतर मी पाचशे निवेदनं स्विकारले आहेत. गर्दीचा फायदा घेऊनच त्याने माझ्यावर शाई फेकली होती, असं चंद्रकात पाटील म्हणाले.
दरम्यान, चंद्रकात पाटील यांच्यावर भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्याकडून शाईफेक करण्यात आली होती. चंद्रकात पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री करण्यात आलं होतं. यावेळी ते पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.