solapur city sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील प्रकार! ई-चालानच्या ६० मशिन्स, तरी वाहतूक पोलिस स्वत:च्या मोबाईलवर काढतात फोटो; वाहनचालकांकडून रोखीने दंड वसुली; पावतीही दिली जात नाही, वाचा...

सोलापूर शहर वाहतूक शाखेकडे ६० ई-चालान मशिन उपलब्ध आहेत. मात्र, या मशिन्स असतानाही काही वाहतूक अंमलदार खासगी मोबाईलवर वाहनांचे फोटो काढून वाहनधारकांकडून रोखीने दंड वसूल करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे, अनेकांना दंडाची पावती दिली जात नसल्याने वाहतूक कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर वाहतूक शाखेकडे ६० ई-चालान मशिन उपलब्ध आहेत. मात्र, या मशिन्स असतानाही काही वाहतूक अंमलदार खासगी मोबाईलवर वाहनांचे फोटो काढून वाहनधारकांकडून रोखीने दंड वसूल करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे, अनेकांना दंडाची पावती दिली जात नसल्याने वाहतूक कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सोलापूर शहरात दररोज लाखो वाहने ये-जा करतात. त्यातील हजारो वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, काही वाहतूक अंमलदार बेशिस्त वाहनचालकांकडून रोखीने पैसे घेत असून त्याची पावती देत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही पोलिस अंमलदारांच्या अशा कृत्यांमुळे संपूर्ण विभागाची बदनामी होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सामान्य सोलापूरकरांकडून व्यक्त होत आहे.

रोखीने दंड दिला तर पावती घ्यावी

वाहतूक शाखेतील पोलिस हवालदारांना ई-चालान मशिन देण्यात आलेल्या आहेत. बेशिस्त वाहनांवर या मशिनद्वारेच दंडात्मक कारवाई केली जाते. रोखीने कोणी दंड मागितल्यास त्याची पावती घ्यावी. तसेच वाहनावरील आधीचा दंड भरल्यास त्याचीही पावती घ्यावी.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

एका शिक्षकाने सांगितला अनुभव...

बाळे येथील एका खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक कामानिमित्त मंगळवारी (ता. २६) सोलापूर शहरात आले होते. जुना पुना नाका परिसरात त्यांना वाहतूक अंमलदाराने अडविले. त्यावेळी शिक्षकाने हेल्मेट घातले होते आणि त्यांच्याकडे वाहन परवाना होता; मात्र ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नव्हते. त्यावेळी संबंधित वाहतूक अंमलदाराने एक हजार रुपयांचा ऑनलाइन दंड टाकणार असल्याचे सांगितले. आदल्या दिवशीही याच शिक्षकाकडून वाहन परवाना घरी राहिल्याने २०० रुपये रोखीने घेण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी संबंधित शिक्षकाला अडविण्यात आले. त्यावेळी दुचाकीचे ‘पीयूसी’ नसल्याने शिक्षकाने आजच ‘पीयूसी’ काढतो, असे सांगितले. मात्र, त्यांच्याकडून ५०० रुपये रोखीने घेण्यात आले. त्याची कोणतीही पावती देण्यात आली नाही, असा अनुभव नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधित शिक्षकाने ‘सकाळ’कडे व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT