IPS solapur SP Atul Kulkarni

 

solapur

महाराष्ट्र बातम्या

‘एसपीं’चा ‘वसूलदार’ना दणका! सोलापूर ग्रामीणमधील ७२४ पोलिसांच्या बदल्या; पण तक्रारी असलेले, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांची दूरवर बदल्या

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ७२४ पोलिस अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सध्याच्याच ठिकाणी मुदतवाढ मिळावी किंवा सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. मात्र, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या मागण्यांना बळी न पडता बदली प्रक्रिया राबविली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ७२४ पोलिस अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सध्याच्याच ठिकाणी मुदतवाढ मिळावी किंवा सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. मात्र, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या मागण्यांना बळी न पडता बदली प्रक्रिया राबविली. विशेषतः एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या आणि ज्यांच्याबाबत तक्रारी होत्या, अशा सुमारे ३०० अंमलदारांवर त्यांनी सर्जिकल स्ट्राईकच केल्याची चर्चा आहे.

बदली प्रक्रियेत ४९ अंमलदारांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. तर १९९ अंमलदारांच्या विनंती बदल्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. या अंमलदारांपैकी अनेकांची ओळख 'अघोषित वसूलदार' अशी असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या तक्रारी थेट पोलिस अधीक्षकांपर्यंत पोचल्या होत्या. अनेक अंमलदारांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्याच ठिकाणी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांच्याविरुद्ध तक्रारी असल्याने पोलिस अधीक्षकांनी त्यांची बदली जिल्ह्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावरील पोलिस ठाण्यात केली. काहींना मुख्यालयात हलविण्यात आले, तर मुख्यालयातील अनेकांना पोलिस ठाण्यांमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली.

दरम्यान, सांगोला, अकलूज, अक्कलकोट दक्षिण आणि माढा पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एका अंमलदाराविरोधात नावानिशी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संबंधित अंमलदारांना घेऊन पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १६) होणाऱ्या क्राईम मिटिंगला उपस्थित राहून माझी भेट घ्यावी, असे आदेश पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले होते. बदली थांबविणे, आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ मिळविणे किंवा सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी काही अंमलदारांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र, पोलिस अधीक्षकांनी अशा कोणत्याही शिफारशीला न जुमानता बदली प्रक्रिया पूर्ण केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रामीण पोलिसांच्या बदल्यांची स्थिती

  • कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदली

  • ४७६

  • मुदतवाढ मिळालेले अंमलदार

  • ४९

  • विनंती बदली फेटाळलेले

  • १९९

  • बदलीतील एकूण अंमलदार

  • ७२४

‘एलसीबी’साठी पहिल्यांदाच परीक्षा

यंदाच्या बदली प्रक्रियेत पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) मोठी खांदेपालट केली आहे. गुन्हे शाखेत सक्षम आणि दर्जेदार अंमलदारांची निवड व्हावी, यासाठी प्रथमच इच्छुक अंमलदारांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत स्थानिक गुन्हे शाखेचे कामकाज, कामाचे स्वरूप, नियुक्तीनंतर काम करण्याची पद्धत आणि 'तुमची निवड या शाखेसाठी का करावी?' अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अंमलदारांनाच स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT