solapur jail

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या तुरुंगात क्षमतेपेक्षा चौपट कैदी! तुरुंगाची क्षमता १४१ अन्‌ तुरुंगात सध्या आहेत ५३० कैदी; रक्तातील नातेवाइकांना आठवड्यातून एकदा भेटता येईल

सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहातील जुन्या पाच बराकींची क्षमता १४१ कैदी राहू शकतात इतकी आहे. मात्र, सध्या या कारागृहात चौपट म्हणजेच ५३० कैदी असल्याची बाब समोर आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त संख्या असल्याने कैद्यांना दाटीवाटीत राहावे लागत आहे. कारागृह शिपाई देखील १४१ कैद्यांच्या मर्यादेतच आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : येथील जेलरोड पोलिस ठाण्यालगत मध्यवर्ती कारागृह आहे. सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहातील जुन्या पाच बराकींची क्षमता १४१ कैदी राहू शकतात इतकी आहे. मात्र, सध्या या कारागृहात चौपट म्हणजेच ५३० कैदी असल्याची बाब समोर आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त संख्या असल्याने कैद्यांना दाटीवाटीत राहावे लागत आहे. कारागृह शिपाई देखील १४१ कैद्यांच्या मर्यादेतच आहेत.

सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा खूपच जास्त कैदी आहेत. शिक्षा लागेपर्यंत ते सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहात असतात. शिक्षा लागल्यानंतर कैद्यांची रवानगी कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात किंवा पुण्यातील येरवडा कारागृहात केली जाते. आपल्या येथे तात्पुरत्या स्वरूपातील म्हणजेच ज्यांच्या खटल्यांची सुनावणी सुरू आहे, असे कैदी असतात. कारागृहात चार नव्या बराकी तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील एक बराक सुरू करण्यात आली असून, त्याची क्षमता ६० कैद्यांची आहे. तरीपण, कैद्यांच्या दाटीमुळे त्या नव्या बराकीत देखील ९५ कैदी ठेवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, कैद्यांची दाटी खूपच असल्याने आता काही दिवसांत उर्वरित तीन बराकी देखील सुरू करण्यात येणार आहेत. तरीपण, क्षमतेपेक्षा सोलापूरच्या कारागृहात जास्तच कैदी असणार आहेत. नवे कारागृह आणि कारागृहाची क्षमता वाढविण्याची घोषणा राज्याच्या गृह विभागाने अनेकदा केली, पण त्यानुसार कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील बहुतेक कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याची स्थिती आहे. कैदी कमी-अधिक होतात, पण त्यांचे प्रमाण क्षमतेपेक्षा चौपट नेहमीच असते.

मध्यवर्ती कारागृहाची सद्य:स्थिती

  • कैद्यांची एकूण क्षमता

  • १४१

  • सध्या असलेले कैदी

  • ५३०

  • जुन्या बराकी

  • नव्या बराकी

  • नवीन बराक सुरू

रक्तातील नातेवाइकांनाच भेटण्याची संधी

मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना नातेवाइकांना भेटण्याची संधी दिली जाते. पण, त्या कैद्याच्या रक्ताच्या नात्यातील लोकांनाच भेटता येते. त्यासाठी त्यांना त्यांचे ओळखपत्र (आधारकार्ड वगैरे) द्यावे लागते. आठवड्यातून एकदा ते रीतसर परवानगी घेऊन त्या कैद्याला भेटू शकतात. सारखे सारखे भेटू दिले जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddaramaiah Latest News : सिद्धरामय्या घेताय राजकारणातून निवृत्ती? ; मुलाच्या विधानाने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Uganda Accident: भयंकर! ओव्हरटेक करण्याचा बस चालकाचा प्रयत्न अन्...; भीषण अपघातात ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर

Navi Mumbai News: दिवाळीनिमित्त पोलीस सतर्क! सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

Mumbai News: लाखोंच्या शासकीय निधीची अफरातफर, माजी आमदारांविरोधात भाजप आक्रमक; चौकशीची मागणी

Latest Marathi News Live Update : राजदच्या श्वेता सुमन यांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT