Solapur Lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis slam Praniti Shinde PM Modi Sabha politics News  
महाराष्ट्र बातम्या

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Solapur Lok Sabha Election Latest News : देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे.

रोहित कणसे

Solapur Lok Sabha Election Latest News : देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. यादरम्यान राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आज महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधाकांवर जोरदार टीका केली.

जय श्रीरामच्या घोषणनेने भाषणाची सुरूवात करत फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले, या निवडणुकीत लढाई राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यातील नसून ही लढाई नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनवायचंय की २६ पक्षांच्या खीचडीला जागा द्यायचीय याची लढाई आहे. देशात कोण प्रधानमंत्री पाहिजे? असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थितांना विचारला.

देशात कोविडची महामारी आल्यानंतर तुम्हाला आम्हाला जीवंत ठेवण्यासाठी या देशाला मोदींनी नेतृत्व दिलं. आतंकवादाने डोकं वर काढल्यानंतर घुसून सर्जीकल स्ट्राइक करणारे मोदी आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

ही जी राहुल गांधीची खिचडी तयार झालीय, ती देशात कोविड किंवा युद्धाची स्थिती निर्माण झाल्यास नेतृत्व करू शकते का? राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, मुलायम सिंग यांचा मुलगा, लालू प्रसाद यांचा मुलगा, ममता बॅनर्जी, स्टॅलीन यापैकी कोणी देशाचं नेतृत्व करू शकतो का? देशात एकच व्यक्ती देशाचं नेतृत्व करू शकतो तो म्हणजे नरेंद्र मोदी, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जवानांचा अपमान सोलापूरकर सहन करणार का?

दुर्देवाने आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचे विचार बघा, वडील म्हणतात देशात हिंदू आतंकवाद आहे, तर मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला हा भाजपवाल्यानी घडवलेलं षडयंत्र आहे. निवडणूका येतील जातील पण हा जवान आणि शहिदांचा अपमान सोलापूरकर सहन करणार आहेत का? अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि त्यांचे वडिल सुशिलकुमार शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोनू सूदने केला स्टार प्लसच्या नवीन शो 'संपूर्णा'चा ट्रेलर लॉन्च

SCROLL FOR NEXT