Solapur Loksabha 2024: Praniti Shinde vs Ram Satpute esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर लोकसभा : दोन फेरीत प्रणिती शिंदेना २१ हजार ६७ मतांचा लिड; राम सातपुते दोन्ही फेरीत पिछाडीवर

पहिल्या फेरीत लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदेंनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीत ‘नोटा’ला २६८ मते पडली आहेत. या फेरीत आमदार प्रणिती शिंदेंनीच बाजी मारली असून राम सातपुते यांना दुसऱ्या फेरीत १९ हजार ७० तर आमदार प्रणिती शिंदेंना ३४ हजार ८९९ मते मिळाली आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : ‘ईव्हीएम’मधील मतमोजणीची पहिली फेरी पार पडली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे पाच हजार २३८ मतांनी पुढे आहेत. पहिल्या फेरीत ‘नोटा’ला १८१ मते पडली आहेत. पहिल्या फेरीत लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदेंनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीत ‘नोटा’ला २६८ मते पडली आहेत. या फेरीत आमदार प्रणिती शिंदेंनीच बाजी मारली असून राम सातपुते यांना दुसऱ्या फेरीत १९ हजार ७० तर आमदार प्रणिती शिंदेंना ३४ हजार ८९९ मते मिळाली आहेत.

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत प्रा. अर्जुन ओव्होळ यांना १००, कुमार लोंढे यांना ३७, युगंधर ठोकळे यांना ६३, अशिष बनसोडे यांना ४९७, विजयकुमार उघडे यांना ४४, कृष्णा भिसे यांना २४, सुदर्शन खंदारे यांना २०, महासिद्ध गायकवाड यांना २१, परमेश्वर गेजगे यांना ६५, नागमुर्ती भंते यांना ५५, रमेश शिखरे यांना १३८, श्रीविद्या दुर्गादेवी यांना १५०, सचिन मस्के यांना १४, सुनीलकुमार शिंदे यांना ५९, प्रा. सुभाष गायकवाड यांना १६ व शिवाजी सोनवणे यांना १७ मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत पण या उमेदवारांची अशीच स्थिती आहे.

पहिली फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ४३४५ ३६८४

शहर उत्तर ४५२८ ४३६०

शहर मध्य ४०४१ ३९४२

अक्कलकोट ४८५४ ४८४८

दक्षिण सोलापूर ५९९३ ३४५५

पंढरपूर ५७६१ ३९९५

एकूण २९,५२२ २४,२८४

--------------------------------------------------

दुसरी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५४५३ ११९६

शहर उत्तर ३८३२ ५७६८

शहर मध्य ७६५४ १७१३

अक्कलकोट ५१६९ ४३८५

दक्षिण सोलापूर ५३०६ ३०६१

पंढरपूर ७४८५ २९४७

एकूण ३४,८९९ १९,०७०

तिसऱ्या फेरीत धैर्यशिल मोहिते पाटलांची आघाडी

तिसऱ्या फेरीत माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमदेवार धैर्यशिल मोहिते- पाटील यांनी १० हजार ५०२ मतांची आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police constable molests student on train Video : रेल्वेत झोपेचं सोंग घेवून शेजारी बसलेल्या विद्यार्थीनिचा विनयभंग करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक!

Pune News : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला ईपीएफओचा दणका; १२० कोटी ९० लाख रुपये पीएफ भरण्याचे आदेश!

Karad Crime : कराडमध्ये पोलिसांच्या ताब्यातील आरोपी बेड्यांसह पसार; पुणे-बंगळूर महामार्गावर खळबळ!

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

SCROLL FOR NEXT