Solapur Airport

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

रविवारी मुंबईस जाणारी फ्लाईट फुल होती एकच तिकीट शिल्लक होते, ते ४२ हजार रुपयांस विकले गेले असून, हे आतापर्यंत सर्वाधिक किमतीस विकलेले तिकीट आहे. मागील आठवड्यात मुंबईसाठीचे एक तिकीट २७ हजारास तर गोव्यास जाण्यासाठी १८ हजारास तिकीट विक्री झाले होते. उन्हाळी सुट्या व लग्नसराईमुळे विमानांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मागील आठवड्यापासून विमानाने सोलापूरहून गोवा व मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. रविवारी मुंबईस जाणारी फ्लाईट फुल होती. एकच तिकीट शिल्लक होते, ते ४२ हजार रुपयांस विकले गेले. हे आतापर्यंत सर्वाधिक किमतीस विकलेले तिकीट आहे. मागील आठवड्यात मुंबईसाठीचे एक तिकीट २७ हजारास तर गोव्यास जाण्यासाठी १८ हजारास तिकीट विक्री झाले होते. उन्हाळी सुट्या व लग्नसराईमुळे विमानांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

सोलापूरहून मुंबईसाठी ३ हजार ५०० तर गोव्यासाठी २२०० रुपये तिकीट कंपनीकडून ठेवण्यात आले आहे. मध्यंतरी मुंबईस प्रतिसाद कमी मिळत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत होते. पण आता बारावी, दहावी परीक्षा संपल्यानंतर विमानसेवेसाठी पुन्हा गर्दी वाढली आहे. शिवाय लग्नसराई व विशेष कामांसाठी तातडीने तिकिटांची मागणी वाढली आहे.

४२ हजार रुपयांचे तिकीट उड्डाणाच्या आधी चार तास बुक करण्यात आले आहे. तर गोव्यासाठी १८ हजाराचे तिकीट एक याप्रमाणे चार तिकिटे एक दिवस आधी बुकिंग करण्यात आली होती. गोव्यासाठी प्रवाशांचा प्रतिसाद वाढला असून, मुंबईसाठी मागील आठवड्यांपासून ७० टक्क्याहून अधिक प्रवासी वाढले आहेत.

गोव्यासाठी एप्रिलपर्यंत प्रवशांचा प्रतिसाद

मुंबईसाठी काही ठराविक दिवस प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: शनिवार व रविवारच्या विमानाला चांगली गर्दी होत आहे. पण मुंबईच्या तुलनेत गोवा विमानसेवेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्चबरोबरच एप्रिल महिन्यातही प्रवाशांची गोव्यासाठी प्रवाशांचे बुकिंग होत आहे. गोव्यासाठी फॅमिली बुकिंगसह ग्रुप बुकिंगची मोठी संख्या आहे. मुंबईसाठी वैयक्तिक कामांबरोबरच शासकीय कामांसाठी जाणाऱ्याचेही बुकिंग वाढले आहे.

आतापर्यंतचे सर्वाधिक किंमतीने विकलेले तिकीट

सोलापूरहून मुंबईसाठी ४२ हजार रुपयांचे तिकीट बुक झाले आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक किंमतीने विक्री झालेले हे तिकीट आहे. यापूर्वी २७ हजार रुपये सर्वाधिक दर आहे. गोव्यासाठी एका तिकिटास सर्वाधिक १८ हजार रुपये प्रवाशांनी मोजले आहेत.

- चेतन लोढा, प्रकाश ऑनलाईन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Dispute: भारत-नेपाळ संबंधांमध्ये मोठी हालचाल! बालेन शहा सरकार भारतासमोर ४ अटी ठेवणार; आणखी एक मोठा राजनैतिक डाव

नाना पाटेकरांनी खरंच कानाखाली मारली मग मी पण दिली एक ठेवून... अभिनेत्रीने सांगितला 'यशवंत' सिनेमाचा किस्सा

Mumbai Crime: पाच महिन्यांनी हत्येचा उलगडा, नाल्याच्या चेंबरमध्ये आढळला कुख्यात गँगस्टरचा सांगाडा

Police Recruitment : आंबेगाव तालुक्याच्या दुष्काळग्रस्त वडगावपीर गावातील निकिता आदक हिची जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात निवड

India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेश

SCROLL FOR NEXT