mahapalika solapur 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर महापालिका! भाजपविरुद्ध मनसे, वंचित बहुजन आघाडी, माकप, काँग्रेस, उबाठा शिवसेना व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची वज्रमूठ; ‘या’ प्रभागात MIM स्वबळावर

महापालिका निवडणुकीत महायुतीला विशेषत: भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमवेत मनसे, माकप, वंचित बहुजन आघाडी देखील असणार आहे. त्यांच्यात जागा वाटपाचा तिढा नसणार आहे. पण, कोणत्या पक्षाला किती जागा व कोणते प्रभाग कोणाला सोडायचे, यावर रविवारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका निवडणुकीत महायुतीला विशेषत: भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमवेत मनसे, माकप, वंचित बहुजन आघाडी देखील असणार आहे. त्यांच्यात जागा वाटपाचा तिढा नसणार आहे. पण, कोणत्या पक्षाला किती जागा व कोणते प्रभाग कोणाला सोडायचे, यावर रविवारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

भाजपने स्वबळाची तयारी केली असून, महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण एकत्रितपणे लढलो तर आपल्याला सर्वाधिक जागा मिळू शकतात, असा विश्वास महाविकास आघाडीला वाटत आहे. त्यानुसार शहरातील २६ प्रभागांमध्ये महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारीच उमेदवार असतील, अशी सद्य:स्थिती आहे. त्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महेश गादेकर, रियाज मोमीन, मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, वंचित बहुजनचे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, मापकचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पत्नी कामिनी आडम असे प्रमुख उमदेवार असतील.

त्यांच्यासमवेत बाकीचे उमेदवार निवडणूक आणायचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे नियोजन असल्याची चर्चा आहे. आम्ही एकजुटीने लढून सर्वात मोठा पक्ष आमची महाविकास आघाडीच राहील, असा विश्वास सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. १६ जानेवारीला कोणता पक्ष मोठा आणि कोणाचा महापौर होणार हे स्पष्ट होणार आहे.

‘एमआयएम’चा एकला चलो रेचा नारा

भाजपविरोधात निवडणूक लढताना एमआयएमने (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन)शहरातील प्रभाग १४, १६, १७, २०, २१ आणि २२ मध्ये स्वबाळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शहराध्यक्ष शौकत पठाण यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. हे सहा प्रभाग सोडून बाकीच्या प्रभागांमध्ये जुळवून घेण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासमवेत बोलणे सुरू असल्याचेही शौकत पठाण यांनी सांगितले. पण, त्यांचा हा प्रस्ताव महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते मान्य करणार नाही हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या रणांगणात एमआयएम स्वबळावरच मैदानात असणार आहे.

लवकरच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची होईल बैठक

महापालिका निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीमधूनच लढणार आहोत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, मनसे, माकपसह अन्य पक्ष सहभागी असतील. जागावाटपाचा मुद्दा आमच्यात प्रमुख नसणार आहे, उमेदवारी अर्ज भरायला सुरवात होण्यापूर्वी आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यावेळी सविस्तर चर्चा होऊन आमची सर्वांची निवडणुकीची रणनिती निश्चित होईल.

- गणेश वानकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : सेवागिरी यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार; शाहिद मुलानींच्या बैलजोडीने जिंकला 'पुसेगाव हिंदकेसरी' किताब, तब्बल 1100 बैलगाड्यांचा सहभाग

Cameron Green: काल आयपीएल लिलावात २५.२० कोटी मिळाले अन् आज पठ्ठ्या भोपळ्यावर बाद झाला... KKR ला फसल्यासारखं झालं...

Viral Video: 'सर, हेल्मेट है, फिट नही आता', वृद्ध दुचाकीस्वाराचं उत्तर ऐकून सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

Kolhapur Forest Incident : बंदुका, सर्च लाईट, दोरी; शिकारींचा जंगलात रात्रीस खेळ चाले, वन विभागाने थरारकरित्या पाठलाग केला अन्

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT