solapur election

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर महापालिका निवडणूक! ३५०० पोलिसांचा ४८ तास खडा पहारा; क्युआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्याही तुकड्या; शहरात ४६ ठिकाणी फिक्स पॉइंट

बुधवारी सोलापूर शहरातील एक हजार ९१ बूथवर मतदान पेट्या वितरित करण्यात आल्या आहेत. त्यासोबत पोलिसांचा बंदोबस्तही प्रत्येक बूथवर दाखल झाला. निवडणुकीसाठी सोलापूर शहर व बाहेरील अधिकारी, अंमलदार असा एकूण साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमला आहे. ४८ तासांचा हा बंदोबस्त मतदान पेट्या गोदामात जमा झाल्यावर संपणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेसाठी उद्या (गुरुवारी) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापूर शहरातील एक हजार ९१ बूथवर मतदान पेट्या वितरित करण्यात आल्या आहेत. त्यासोबत पोलिसांचा बंदोबस्तही प्रत्येक बूथवर दाखल झाला. निवडणुकीसाठी सोलापूर शहर व बाहेरील अधिकारी, अंमलदार असा एकूण साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमला आहे. ४८ तासांचा हा बंदोबस्त मतदान पेट्या गोदामात जमा झाल्यावर संपणार आहे.

सोलापूर महापालिकेसाठी बाहेरील जिल्ह्यातून एक पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, दोन पोलिस निरीक्षक, ६० सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ४७५ अंमलदार आले आहेत. हा बंदोबस्त सोलापूर शहरातील १८०० अंमलदारांसमवेत असणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी शिघ्र प्रतिसाद दलाच्या पाच तुकड्या, दंगा नियंत्रण सहा पथके, राज्य राखीव पोलिस बलाच्या दोन तुकड्या देखील बंदोबस्तात असतील.

प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत दोन बीट मार्शल, सेक्टर पेट्रोलिंगच्या ३५ गाड्या शहरात गस्त घालणार आहेत. प्रत्येक बूथ आणि तेथील १०० मीटर परिसरात देखील पोलिस असणार आहेत. शहरातील संपूर्ण बंदोबस्तावर पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, गौहर हसन यांचे विशेष लक्ष असणार आहे. वरिष्ठ अधिकारी देखील शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत.

बंदोबस्ताचे असे नियोजन

  • जलद प्रतिसाद पथके (क्युआरटी)

  • दंगा नियंत्रण पथक (आरसीपी)

  • राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ)

  • होमगार्ड

  • १,०००

  • पोलिस अंमलदार

  • १,३००

  • पोलिस अधिकारी

  • १९०

मतदान पेट्या जमा केल्यावर संपेल बंदोबस्त

महापालिकेसाठी उद्या (गुरुवारी) मतदान होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान पार पडल्यावर प्रत्येक मतदान केंद्रावरील पेट्या रामवाडी गोदामात जमा केल्या जातील. त्यानंतर बुधवारी (ता. १४) नेमलेला बंदोबस्त संपणार आहे. गुन्हे शाखा, विशेष शाखा, राज्य गुप्तावार्ता व स्थानिक पोलिसांची पथकांसह साध्या वेशातील पोलिस देखील शहरात फिरणार आहेत. निकालाच्या दिवशी शुक्रवारी (ता. १६) देखील शहरात असाच तगडा बंदोबस्त असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

voting without voter ID : मतदार ओळखपत्र नसले तरीही करता येणार मतदान, जाणून घ्या कसं?

Big Blow: भारताच्या स्टार खेळाडूची IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेतूनही माघार; वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

Iran Calls India : अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती असताना, इराणने भारताला केला फोन अन्...

MCA: मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय! रोहित - रहाणेसह IPL खेळणाऱ्या खेळाडूंना देणार नाही करार; कारण घ्या जाणून

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT