महाराष्ट्र बातम्या

पवई "आयआयटी'चा अमेरिकेत झेंडा 

राजाराम ल. कानतोडे

सोलापूर - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) पवईच्या (मुंबई) "इनोव्हेटिव्ह सेल'च्या विद्यार्थ्यांनी अमेरिकन सोसायटी ऑफ मॅकेनिकल इंजिनिअर्सने आयोजित केलेली "स्टुडंस डिझायनिंग 2017' स्पर्धा जिंकली आहे. फ्लोरिडा प्रांतातील तामपा शहरात आज ही स्पर्धा झाली. या संघाला 40 हजार डॉलरचे बक्षीस मिळाले आहे. भारतातील विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली आहे, अशी माहिती या संघातील प्रवीण राऊत या विद्यार्थ्याने अमेरिकेतून "सकाळ'ला दिली. 

जागतिक पातळीवर दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. जागतिक स्पर्धेआधी आशियाई पॅसिफिक पातळीवरची स्पर्धा जयपूर येथे मार्चमध्ये झाली होती. तिथेही पवईच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर या संघाची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली होती. या विद्यार्थ्यांनी एक "रोबोट मशिन' बनविले आहे. ते मशिन पायऱ्या चढते, दहा मीटर अंतर कापते, वजन उचलते, टेनिस बॉल टाकते आणि गोल्फचा बॉल हीट करते, अशी पाच कामे करते. "आयआयटी' पवईच्या संघात प्रवीण राऊत याच्याबरोब आकाश किशोरे, अंजनाकुमार पाटील, रवी जैन, माणिक देव, निशीत नागर, आयुष खंडेलवाल, दीपक जैन, रितेश घोष, अथर्व जयपूरकर यांचा समावेश होता. रवी जैन याने टीमचे नेतृत्व केले. अभिजित गुप्ता यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

सहा महिन्यांच्या कष्टाला यश आले. जयपूरमधील स्पर्धा जिंकल्यानंतर आम्ही प्रचंड मेहनत घेतली होती. अनेक रात्री आम्ही जागून काढल्या. आपला देश पहिल्यांदाच या स्पर्धेत जिंकल्याचा आम्हाला अभिमान आहे. 
- प्रवीण राऊत, स्पर्धक 

शेतकऱ्याचा मुलगा 
स्पर्धेत सहभागी झालेला प्रवीण राऊत हा सोलापूर जिल्ह्यातील केत्तूरचा (ता. करमाळा) रहिवासी आहे. त्याचे वडील पांडुरंग राऊत हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मुलाने मिळविलेल्या यशाची बातमी सांगितल्यानंतर ते हरखून गेले. समाजासाठी प्रवीणने काहीतरी करावे, अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT