महाराष्ट्र

महा-ई-सेवा केंद्राला सहकारमंत्र्यांची भेट 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील महा-ई-सेवा केंद्राला भेट दिली. याठिकाणी त्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरताना कोणत्या अडचणी येतात, याची माहिती संबंधित ऑपरेटर व शेतकऱ्यांकडून घेतली. 

सरकारने कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा निर्णय घेतला आहे. तो अर्ज भरण्यासाठी केंद्रावर सहकुटुंब यावे लागते. एक अर्ज भरण्यासाठी दिवसाच्यावेळी अर्धा ते एक तास लागतो, तर तोच अर्ज रात्रीच्यावेळी भरला तर पाच-दहा मिनिटांत भरून पूर्ण होतो, असे तेथील ऑपरेटरने सहकारमंत्री देशमुख यांना सांगितले. ज्या शेतकऱ्यांची संयुक्त कर्जखाती आहेत, त्यासंदर्भातही माहिती भरताना अडचणी येत असल्याचे सहकारमंत्र्यांना सांगण्यात आले. 

या गावामध्ये 225 कर्जदार खातेदार आहेत, त्यापैकी 143 जणांची माहिती भरून पूर्ण झाली आहे. 79 शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. एकरकमी परतफेड या योजनेमध्ये 63 शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती विकास सोसायटीच्या सचिवांनी दिली. शेतकऱ्यांना अर्ज भरताना काही अडचणी आल्यास जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन सहकारमंत्री देशमुख यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT