यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर की शोलापूर! काळजी घ्या, सोलापुरात आज उच्चांकी तापमानाची नोंद; पारा ४४.४ अंशावर

राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकू लागला आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोलापूरसह राज्यातील अन्य शहरांमधील तापमान देखील वाढत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी (ता. ५) सोलापूरमध्ये झाली. रविवारी ४४.४ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान होते.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकू लागला आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोलापूरसह राज्यातील अन्य शहरांमधील तापमान देखील वाढत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी (ता. ५) सोलापूरमध्ये झाली. रविवारी ४४.४ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान होते. त्यामुळे सोलापूर नव्हे शोलापूर असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत.

३० एप्रिल रोजी (सोमवारी) सोलापूरचे तापमान सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस इतके होते. रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. सोलापुरातही रविवारी कमाल तापमानाचा पारा ४३.७ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती. सोलापुरात सलग दोन दिवस ४४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असल्याने एप्रिलनंतर मे महिन्यातील ही उष्णतेची दुसरी लाट मानली जात आहे.

मागील १३ ते १४ दिवसांपासून सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिकच आहे. संपूर्ण मे महिन्यातही असेच तापमान राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये, बाहेर पडणाऱ्यांनी सुती कापडांचा वापर करावा. सोबत पाण्याची बाटली ठेवावी. डोळ्यावर गॉगल असावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. जास्त तापमानाचा त्रास होऊ लागल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत, असेही सांगण्यात येत आहे.

गतवर्षी पाऊस कमी, जमिनीची पाणीपातळी खालावली

मागील पावसाळ्यात सरासरीपेक्षा ५० टक्केच पाऊस झाला. त्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यातील जमिनीतील पाणीपातळी जवळपास एक मीटरने खोलवर गेली आहे. दुसरीकडे तीव्र उन्हामुळे झाडांनी माना टाकल्या आहेत. नवीन वृक्ष लागवड अपेक्षित झालेली नाही. झाडांची संख्या कमी झाल्याचाही परिणाम उष्णता वाढीवर होत असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT