solapur city cp m raj kumar

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या पोलिस आयुक्तांची धडक कारवाई! 4 दिवसाला 1 तडीपार, 7 दिवसात 1 येरवडा कारागृहात; 4,542 सराईत गुन्हेगारांकडून घेतले चांगल्या वर्तनाचे बॉण्ड

महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ५५, ५६ व ५७ नुसार ८३ सराईत गुन्हेगारांना या वर्षात तडीपार केले आहे. शरीराविषयक गुन्हे करणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक जणांकडून एक वर्षाच्या मुदतीचे अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी २०२५ मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शहरात सात पोलिस ठाण्यांकडून शरीराविषयक व मालाविषयक गुन्हे दाखल असलेल्यांची यादी मागवून पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजय कबाडे यांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यात एकूण चार हजार ५४२ जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ५५, ५६ व ५७ नुसार ८३ सराईत गुन्हेगारांना या वर्षात तडीपार केले आहे. शरीराविषयक गुन्हे करणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक जणांकडून एक वर्षाच्या मुदतीचे अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे. तर गर्दीच्या ठिकाणी संशयितरीत्या फिरणारे, मालाविषयक गुन्हे करणारे, हातभट्टी विकणारे, बंधपत्र घेऊनही त्याची रक्कम जमा न करणाऱ्यांवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे.

शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी तडीपार, एमपीडीए अंतर्गत कारवाया करून त्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील एक हजाराहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईचे स्वरूप असे...

  • समाजघातक ८३ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले.

  • शरीराविषयक गुन्हे दाखल असलेल्या ३६३१ जणांकडून एक वर्षाच्या अंतिम मुदतीचे घेतले बंधपत्र.

  • गर्दीच्या ठिकाणी संशयितरीत्या फिरताना २५७ जणांकडून चांगल्या वर्तनाचे एक वर्षाचे अंतिम बंधपत्र घेतले.

  • मालाविषयक गुन्हे दाखल असलेल्या ४१३ जणांकडूनही चांगल्या वर्तनाचे घेतले बंधपत्र.

  • हातभट्टी विक्री करणाऱ्या २४१ जणांकडून चांगल्या वर्तनाचे एक वर्षाच्या मुदतीचे बंधपत्र घेतले.

  • महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ९३ नुसार पाच तर बीएनएसमधील कलम १२९ नुसार एकाची कारागृहात रवानगी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video

Faridabad Factory Fire : 'केमिकल ड्रम्स'चे स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण अग्नितांडव!, दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

ILS Law College Fee Case : शुल्क परताव्याबाबत राज्य सरकारने दोन महिन्यांत निर्णय घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT