solapur crime

 
esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या पोलिस पथकावर पाथर्डीत गोळीबार! जेऊर येथील सराफा व्यापाऱ्यावरील दरोडा प्रकरण; साथीदारांसह आरोपी फरार, अक्कलकोट तालुक्यातील एकजण अटकेत

सोलापूर जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर संशयित आरोपीने गोळीबार केला. ही घटना तालुक्यातील खरवंडी कासार येथे घडली. दरोडा प्रकरणातील संशयित आरोपी पावलस ऊर्फ मेहेर कचरू गायकवाड (रा. खरवंडी, ता. पाथर्डी) हा साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाला.

तात्या लांडगे

सोलापूर/पाथर्डी : सोलापूर जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर संशयित आरोपीने गोळीबार केला. ही घटना तालुक्यातील खरवंडी कासार येथे घडली. दरोडा प्रकरणातील संशयित आरोपी पावलस ऊर्फ मेहेर कचरू गायकवाड (रा. खरवंडी, ता. पाथर्डी) हा साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील सराफ व्यापारी अभिनंदन काशिनाथ पोतदार यांना अडवून त्यांच्याकडील सोने लुटल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संशयित गायकवाड हा खरवंडी येथे असल्याची माहिती सोलापूर पोलिसांना समजताच सहायक पोलिस निरीक्षक विजय आत्माराम शिंदे यांच्या नेतृत्वातील पथक पाथर्डीत गेले झाले.

पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या समन्वयाने खरवंडी बीटचे पोलिस कॉन्स्टेबल आसाराम बटुळे व होमगार्ड मिठू खेडकर यांची मदत घेऊन आरोपीचा खरवंडी परिसरात शोध सुरू होता. गायकवाड हा गुरुवारी रात्री आपल्या घरासमोर काही साथीदारांसह पाइपलाइनचे काम करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, गायकवाड याने पोलिस पथकाला न जुमानता गोळीबार केला.

एक गोळी बटुळे यांच्या जवळून गेली. यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. अंधाराचा फायदा घेऊन त्याने घरासमोर उभ्या असलेल्या कारमधून साथीदारांसह बीडच्या दिशेने पलायन केले. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पावलस ऊर्फ मेहेर कचरू गायकवाड व त्याच्या दोन ते तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सोलापूर व अहिल्यानगर पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरू केली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील एक संशयित अटकेत

या गुन्ह्यात प्रकाश चोरमले (रा. आलेगाव, ता. अक्कलकोट) या संशयितास पोलिसांनी शुक्रवारी (ता. ५) रात्री सोलापूर बस स्थानक परिसरातून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरोडेखोरांनी सराफाला लुटण्यासाठी याची मदत घेतली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने तपास सुरु असून चोरमले यास उद्या (शनिवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

Kasaba Borgaon Drowning : चार बहिणीनंतर विकासचा जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झालेला विवाह; कासारी नदीत बुडून 32 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, पन्हाळ्यातील दुर्घटनेने हळहळ

Crime News: पत्नीचे ऐकत नाही म्हणून जावयाला मारहाण; तिघांवर गुन्हा

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT