Solapur Police employee's wife suicide case

 
esakal
महाराष्ट्र बातम्या

Solapur Crime: सोलापुरात पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या; ८ वर्षांच्या चिमुकलीला बाहेरील खोलीत झोपवले अन्‌ पत्नीने आतील खोलीत घेतला गळफास, पती घरी गेले अन्‌....

सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस अंमलदार वैभव सूर्यवंशी यांच्या पत्नीने अशोक चौक परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. १६) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आला. आकांक्षा वैभव सूर्यवंशी (वय २८) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस अंमलदार वैभव सूर्यवंशी यांच्या पत्नीने अशोक चौक परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. १६) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आला. आकांक्षा वैभव सूर्यवंशी (वय २८) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

वैभव सूर्यवंशी हे नेहमीप्रमाणे सोलापूर तालुका ठाण्यात ड्युटीसाठी गेले होते. त्यांची पत्नी आकांक्षा आठ वर्षीय चिमुकलीसोबत घरी होत्या. मुलगी बाहेरील खोलीत झोपलेली होती. वैभव सूर्यवंशी हे त्यांच्या दैनंदिन उपचाराची औषधे घ्यायला सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिस ठाण्यातून काही वेळासाठी घरी गेले. त्यावेळी मुलगी बाहेरील खोलीत झोपली होती आणि पत्नी आकांक्षाने आतील खोलीत गळफास घेतल्याचे दिसले.

पत्नीने गळफास घेतल्याचे दिसताच घाबरलेले वैभव सूर्यवंशी आरडाओरड करीत बाहेर आले. शेजारील लोक जमा झाले, त्यांनी आकांक्षाला गळफासातून खाली उतरवले आणि सिव्हिलमध्ये नेल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, बेशुद्धावस्थेतील आकांक्षाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांंनी घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाच्या उत्तरीय चाचणीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे नातेवाईकांना सांगितले आहे.

माहेरचे म्हणाले, ‘पतीचा होता त्रास’

पत्नीने आत्महत्या केल्याची बाब पोलिस अंमलदार वैभव सूर्यवंशी यांनी सासूरवाडीला सांगितली. त्यावेळी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास आकांक्षांच्या माहेरील सगळे सोलापुरात आले. त्यांनी जेलरोड पोलिस ठाणे गाठले आणि पतीच्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याची तक्रार केली आहे. दरम्यान, उत्तरीय तपासणी अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा! विनोद तावडे, वसुंधरा राजे अन् स्मृती इराणी यांच्याकडे मोठी जबाबदारी, वाचा यादी...

IND vs SL 1st Test: गंभीरने त्याला राखून ठेवलं, चेंडू जुना होताच गोलंदाजीला आणलं! १४६ धावांची भागीदारी तोडली; कोण आहे तो?

नागपंचमीच्या मुहूर्तावर सुरू झालं स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'चं शूटिंग; कोण आहे मुख्य नायिका? कोणती मालिका संपणार?

Income Tax Office Fire: धुराचे लोट अन् कर्मचाऱ्यांची धावपळ, आयकर विभागाच्या कार्यालयाला आग; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार

Marathi News Live Updates : पायाभूत सुविधांच्या अभावामुळे आज आपण इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडत आहोत - सुळे

SCROLL FOR NEXT