sakal breaking Esakal
महाराष्ट्र बातम्या

देवडी पाटीजवळ सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पकडले ६ कोटींचे MD ड्रग्ज! औंढीच्या दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

चारचाकी वाहनातून एमडी ड्रग्ज विकायला सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ आलेल्या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील तीन किलो ड्रग्ज अंदाजे सहा कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी ठोठावली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : चारचाकी वाहनातून एमडी ड्रग्ज विकायला सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ आलेल्या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील तीन किलो ड्रग्ज अंदाजे सहा कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी ठोठावली आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली एमआयडीसीतील एक बंद कंपनी भाड्याने घेऊन गवळी बंधू घातक एमडी ड्रग्ज तयार करीत होते. मुंबई क्राईम ब्रॅंचने दया नायक यांच्या नेतृत्वाखाली त्या दोघांना मुंबईतच पकडले. त्या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तो कारखाना सिल करून तेथील मुद्देमालही जप्त केला.

या कारवाईत एकूण ११६ कोटींचा मुद्देमाल मुंबई क्राईम ब्रॅंचने हस्तगत केला होता. त्याचा तपास सुरु असतानाच आता मंगळवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी देवडी पाटीजवळ (ता. मोहोळ) सहा कोटींच्या तीन किलो एमडी ड्रग्जसह दोघांना जेरबंद केले. दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके (दोघेही रा. औंढी, ता. मोहोळ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. चारचाकीसह पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

थोडक्यात हुकली ‘ती’ मोठी कारवाई

चिंचोली एमआयडीसीतील कंपनीत एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या गवळी बंधूंची खबर सोलापूर ग्रामीण पोलिसांना लागली होती. ग्रामीण पोलिसांनी त्यांची माहिती घेतली होती आणि एक-दोन दिवसांत कारवाई होणार, तेवढ्यात त्यांना मुंबई क्राईम ब्रॅंचने पकडले. त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या हातून ही कारवाई होवू शकली नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक हिंमत जाधव, उपअधीक्षक अमोल भारती, मोहोळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या पथकाने देवडी पाटीजवळ दोघांना तीन किलो एमडी ड्रग्जसह पकडले.

देवडीजवळच ठरली होती ड्रग्ज विकण्याची डिल

औंढी (ता. मोहोळ) येथील दत्तात्रय घोडके व गणेश घोडके हे दोघे देवडी पाटीजवळ इतरांना त्यांच्याकडील एमडी ड्रग्ज विकणार होते. पण, पोलिसांनी त्या दोघांना पकडल्यावर समोरील व्यक्ती त्याठिकाणी आलाच नाही. आता पोलिस त्या दोघांकडे कसून चौकशी करीत आहेत. ड्रग्ज कोठून आणले, कोणत्या ठिकाणी ते तयार होते, समोर घेणारा कोण होता या बाबींचा तपास केला जात आहे.

गवळी बंधूंनी यापूर्वी १५ किलो ड्रग्ज विकले

सोलापूरजवळील बाळे येथील गवळी बंधूंना मुंबई क्राईम ब्रॅंचने जेरबंद केले आहे. त्यांची पोलिस कोठडी उद्या (गुरुवारी) संपणार आहे. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, तत्पूर्वी मुंबई पोलिसांच्या तपासानुसार गवळी बंधूंनी आतापर्यंत जवळपास १५ किलो (अंदाजे किंमत ३२ कोटी) एमडी ड्रग्ज मुंबईसह अन्य ठिकाणी विकल्याची माहिती समोर आली आहे. ललित पाटील प्रकरणाशी या दोघांचा काही संबंध आढळला नसल्याचेही मुंबई पोलिसांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT