सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळने ८ ते ११ जानेवारीदरम्यान केलेल्या शहरव्यापी सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाला (भाजप) ६५ ते ६८ जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेला ११ ते १३ जागा मिळतील, तर तिसऱ्या स्थानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आणि काँग्रेस यांच्यात चुरस असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ६, एमआयएमला ६ ते ८, तर काँग्रेसला ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना (उबाठा) ३ जागांवर विजय मिळवू शकते, तर राष्ट्रवादी (शप) आणि माकपला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय एक-दोन अपक्ष उमेदवारही निवडून येण्याची शक्यता आहे.
‘सकाळ’ने राबविलेल्या या सर्वेक्षणासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलासह संगमेश्वर, वालचंद आणि छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयांतील पत्रकारिता, राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागातील ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व २६ प्रभागांमध्ये जाऊन २६०० नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांचा राजकीय कल जाणून घेतला. या प्रक्रियेत ८ प्राध्यापकांचा सहभाग होता. तसेच सकाळच्या १५ पत्रकारांनी गेल्या दोन महिन्यांत केलेल्या प्रभागनिहाय अभ्यासाच्या आधारे अंतिम निष्कर्ष काढण्यात आले.
दीडपटीने वाढली भाजपची लोकप्रियता
२०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत भाजपची लोकप्रियता दीड पटीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. याउलट काँग्रेसच्या लोकप्रियतेत जवळपास निम्म्याने घट झाल्याचे चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीचा परिणाम मतविभाजनावर झाला असून त्याचा लाभ भाजपला होताना दिसत आहे. दरम्यान, एमआयएमच्या लोकप्रियतेत किंचित वाढ झाल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.
आठ प्रभाग पूर्णतः भाजपच्या बाजूने
शहरातील एकूण २६ प्रभागांपैकी ८ प्रभागांमध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील. यात प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ८, १०, ११ आणि २६ यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ५, ६, ७, ९, १२, १३, १५, १६, १८, १९, २४ आणि २५ मध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रभाग क्रमांक ६, १२, १३, १७ आणि १८ मध्ये चांगल्या स्थितीत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक २० आणि २२ मध्ये मजबूत असल्याचे दिसून येते. प्रभाग क्रमांक १४, १७, २० आणि २२ मध्ये एमआयएमकडून तगडी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.