solapur News

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागा मिळूनही १५ जणांनीच नेले एबी फॉर्म! दोघे आलेच नाहीत, दोघांनी बदलला पक्ष; दोन इच्छुकांनी दिली ‘ही’ करणे

महाविकास आघाडीतील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला २० जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यातील दोघेजण ‘एबी’ फॉर्म घ्यायला आले नाहीत. दोघांनी आधीच पक्ष बदलला. त्यामुळे २० जागा मिळूनही उमेदवार नसल्याने पक्षाला १५ जणांनी ‘एबी’ फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाविकास आघाडीतील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला २० जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यातील दोघेजण ‘एबी’ फॉर्म घ्यायला आले नाहीत. दोघांनी आधीच पक्ष बदलला. त्यामुळे २० जागा मिळूनही उमेदवार नसल्याने पक्षाला १५ जणांनी ‘एबी’ फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केले.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात प्रभाग सहामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जागा मागितल्या होत्या, पण त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक असल्याने तो प्रभाग मित्रपक्षाला सोडण्यात आला. मात्र, त्या ठिकाणचे उबाठा शिवसेनेचे उमेदवारच दुसऱ्या पक्षात गेल्याची खंत मित्रपक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केली होती. त्यावेळी ५१-५१ जागांचे सूत्र ठरले.

तरीपण, दोन्ही पक्षांकडून सुमारे १३० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. इच्छुकांची संख्या राष्ट्रवादीकडे देखील मोठी होती, त्यामुळे अनेकजण नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. आता पुढील दोन दिवसांत ‘एबी’ फॉर्म मिळेल, या आशेने राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणी कोणी अर्ज भरले, त्यातील कोणाचे अर्ज मागे घ्यायचे, कोठे मैत्रीपूर्ण लढत करायची, हे निश्चित होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.

ज्ञानेश्वर सपाटेंचा शिवसेनेत प्रवेश अन्‌ प्रभाग ७ मध्ये ‘शप’ राष्ट्रवादीची पंचाईत

आघाडीतील जागा वाटपात २० जागा मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांचे उमेदवार फिक्स केले. आपल्याला प्रभाग सातमधून उमेदवारी मिळावी म्हणून माजी महापौर मनोहर सपाटे यांनी उपोषण केले. पण, त्या ठिकाणी त्यांचा पुतण्या ज्ञानेश्वर सपाटे यांना उमेदवारी देण्याचे नियोजन पक्षाने केले होते. मात्र, ज्ञानेश्वर सपाटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला या ठिकाणी पर्यायी उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे या ठिकाणी पक्षाला उमेदवार देता आला नाही.

दोघांकडून हास्यास्पद कारणे अन्‌ एकजण आलाच नाही

प्रभाग २४ व प्रभाग २५ मध्ये दोन महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी फिक्स झाली होती. त्यातील एका महिलेने घरात अडचणी आहेत, मी निवडणुकीला उभारणार नाही, असे सांगितले. तर दुसऱ्या महिला उमेदवाराने, मला २००१ नंतर तीन मुले झाल्याचे कारण दिले. त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी उमेदवार देता आले नसल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तर एका उमेदवारास १०-१५ वेळा कॉल केले, पण तो आलाच नाही. त्यामुळे प्रभाग चारमध्येही पक्षाला ओबीसी पुरुष उमेदवार देता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT