siddheshwar karkhana solapur 
महाराष्ट्र बातम्या

सिध्देश्‍वर कारखान्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सोलापूर येथील सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी प्रस्तावित विमानतळाच्या कामात तसेच विमानांच्या आवागमनात अडथळा ठरणारी असल्याचे मुलकी विमान वाहतूक प्राधिकरणाचे (डीजीसीए) निरीक्षण योग्य आहे. त्यामुळे कारखान्याने ही चिमणी आगामी 60 दिवसांत पाडावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. या निकालाविरूध्द अपील करण्यासाठी कारखान्याला 60 दिवसांचा अवधीही न्यायालयाने दिला आहे.

न्या. अजय खानविलकर व न्या. डी.के. माहेश्‍वरी यांच्या पीठाने हा निकाल दिला. या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने ऍड. निशांत काटनेश्‍वरकर यांनी, डीजीसीएच्या वतीने पी. एस. नरसिंह तर कारखान्याच्या वतीने व्ही. गिरी यांनी युक्तिवाद केला.

सिध्देश्‍वर कारखान्याची ही चिमणी तेथील प्रस्तावित विमानतळासाठी अडथळा ठरणारी असल्याने ती पाडली पाहिजे असे डीजीसीएने म्हटले होते. त्यानंतर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कारखान्याला नोटीसही दिली होती. मात्र अशी नोटीस देणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात येत नाही असा युक्तिवाद करून कारखान्यायाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने ही चिमणी पाडण्याचे निर्देश कारखान्याला दिले. त्या निकालाला कारखान्याच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब करताना ही चिमणी दोन महिन्यांत पाडण्याचे निर्देश दिले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT