cash sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या टेक्स्टाईल एजंटाची ६८ लाख रुपयांची फसवणूक! शेअर मार्केटमधून १००० टक्के नफ्याचे आमिष; विश्वास ठेवला, लिंकवर क्लिक, नफा सोडा मुद्दलही लंपास, वाचा...

सोलापूर शहरातील टेक्स्टाईल एजंट किरण नागनाथ कोटा (वय ४९, रा. रंगराज नगर, मार्केट यार्डामागे, सोलापूर) यांना सायबर गुन्हेगारांनी ६८ लाख २६ हजार रुपयास फसविले आहे. २० एप्रिल ते २१ मे या काळात फसवणूक झाली आहे. या प्रकरणी त्यांनी सोलापूर शहर सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील शहरातील टेक्स्टाईल एजंट किरण नागनाथ कोटा (वय ४९, रा. रंगराज नगर, मार्केट यार्डामागे, सोलापूर) यांना सायबर गुन्हेगारांनी ६८ लाख २६ हजार रुपयास फसविले आहे. २० एप्रिल ते २१ मे या काळात फसवणूक झाली आहे. या प्रकरणी त्यांनी सोलापूर शहर सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादी कोटा यांना १९ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घरी असताना ते मोबाईलवर स्वत:चे फेसबूक अकाऊंट पाहत होते. त्यावर आयआयएफएल कॅपिटल लि. या अनोळखी कंपनीची एक जाहिरात दिसली. त्यावर क्लिक केले आणि ते एका व्हॉट्‌सॲप ग्रूपमध्ये समाविष्ठ झाले. त्या ग्रूपमध्ये इतरही सदस्य होते. त्यात आर व्यंकटरमन, टीना मल्होत्रा, टीना या तिघांचे ग्रूप ॲडमिन म्हणून नंबर होते. त्याच रात्री पावणेदहाच्या सुमारास टीना मल्होत्रा आयआयएफएल सेक्युरिटीज या नावाच्या अनोळखीने माझ्या व्हॉट्‌सॲप क्रमांकावरून ‘प्लिज कॉल’ असा मेसेज केला.

दुसऱ्या दिवशी टीनाने व्हॉट्‌सॲपवर ‘गुड इव्हिनिंग सर’ असा मेसेज केला. त्यानंतर तिने ऑनलाईन ट्रेडिंगसाठी ‘डीएमए’ (डायरेक्ट मार्केट ॲक्सेस) खात्याची माहिती दिली. ट्रेडिंग कसे चालते, नफा कसा मिळतो हे सांगितले. फिर्यादीस शेअर मार्केटची माहिती असल्याने ती माहिती खरी वाटली. त्यानंतर फिर्यादी कोटा यांनी पैसे गुंतवले आणि फसले. शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे.

कोटा यांनी लिंकवर क्लिक केले अन्‌...

२० एप्रिलला दुपारी सव्वाएकच्या सुमारास कोटा यांना टीना या अनोळखीने पॅनकार्डचा फोटो पाठवायला सांगितला. त्यानंतर व्हॉट्‌सअपवर पाठवलेल्या एका लिंकवर क्लिक केले आणि ते पुन्हा एका व्हॉट्‌सॲप ग्रूपमध्ये समाविष्ठ झाले. त्याठिकाणी एकजण व्हॉट्‌सॲप संपर्क साधू लागला. गुंतवणूक केलेल्या रकमेवर वर्षात एक हजार टक्के नफा मिळेल, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले. २० एप्रिलला एक लाख रुपये, २२ एप्रिलला २० हजार, २५ एप्रिलला ३० हजार, ४ मे रोजी ३० लाख, ६ मे रोजी नऊ लाख ९६ हजार रुपये, अशी रक्कम गुंतवली. ‘डीएमए’ खात्यात २० दिवसांत गुंतवलेल्या रकमेसह एकूण ७९ लाख ८० हजार १०० रुपये दिसले. २० दिवसांत २९ लाख ३४ हजार १०० रुपयांचा नफा झाल्याचे ऑनलाईन दाखविले. त्यावेळी ८५ हजार काढण्याची रिक्वेस्ट टाकली, पण ती नाकारली. त्यानंतर विविध शुल्क सांगून आणखी पैसे घेतले. पण, ना नफा मिळाला ना मुद्दल, असेही फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT