Sanjay Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक; कुठे घडली घटना?

शनिवारी गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाल्यानंतर रविवारीदेखील संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक झाल्याची घटना घडली आहे.

संतोष कानडे

सोलापूरः शनिवारी गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाल्यानंतर रविवारीदेखील संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक झाल्याची घटना घडली आहे.

सोलापूरमध्ये चप्पलफेकीची घटना घडली असून हा प्रकार नेमका कुणी केला, याबाबत स्पष्टता नाहीये. ज्या कार्यकर्त्यांनी चप्पलफेक केली त्यांनी 'नारायण राणे जिंदाबाद' अशा घोषणा दिल्याची माहिती आहे.

संजय राऊत यांच्या गाडीवर केवळ चप्पल फेकलेली नसून चप्पलांनी भरलेली पिशवी फेकण्यात आल्याची माहिती आहे. संजय राऊत हे रविवारी सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सोलापूरमध्ये हजर होते.

रविवारी संध्याकाळी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉलेटलच्या उद्घाटनासाठी यांनी हजेरी लावली. कार्यक्रम आटोपून परतत असताना पुलावरुन अज्ञात कार्यकर्त्यांनी चपलांनी भरलेली राऊतांच्या गाडीच्या दिशेने फेकली.

यावेळी त्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस त्या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत. कार्यक्रमांच्या आयोजकांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Marathi News: तिसऱ्यांदा चुकला तरी श्रेयस अय्यरवर होणार नाही बंदीची कारवाई, पण...; आयपीएलचा नवा नियम घ्या जाणून

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Fake Caste Certificate: बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण! २० वर्षांनी गुन्हा दाखल, पण वेळ निघून गेली

'या' मराठी अभिनेत्रीने 19 व्या वर्षी केलेलं लग्न; परपुरुषासोबत परदेशात गेली पळून पण रस्त्यावर राहण्याची आली वेळ

Latest Marathi News Live Update : साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात

SCROLL FOR NEXT