solapur-vijapur road

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

जुना विजापूर नाका ते ए.जी. पाटील कॉलेजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून सर्व्हिस रोड केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मंगळवारपासून दुसऱ्यांदा या रस्त्यावरील अतिक्रमणाचा सर्व्हे होणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : येथील जुना विजापूर नाका ते ए.जी. पाटील कॉलेजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून सर्व्हिस रोड केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मंगळवारपासून दुसऱ्यांदा या रस्त्यावरील अतिक्रमणाचा सर्व्हे होणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

सोलापूर-विजयपूर महामार्गावर सर्व्हिस रोड (डीपी रोड) मंजूर असून, ‘एनएचएआय’तर्फे त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ‘एनएचएआय’ने या रोडवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात महापालिकेला पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर मे २०२५ मध्ये महापालिकेने सर्व्हे केला. त्यावेळी ९५ जणांची बांधकामे अनधिकृत असल्याची बाब समोर आली होती. त्यातील काही बांधकामे पोलिस बंदोबस्तात पाडण्यातही आली. परंतु काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

वास्तविक, विजयपूर रस्त्याच्या दुभाजकापासून दोन्ही बाजूंना १५ मीटर अंतरात कोणत्याही बांधकामास परवानगी नाही. तरीदेखील अनेकांनी पक्की बांधकामे केली असून काहींनी पत्र्याचे शेड मारले आहेत. त्यातील काहींनी आमच्याकडे बांधकाम परवाने असल्याचेही सांगितले होते. परंतु आता सर्व्हेवेळी त्या लोकांना त्यांच्याकडील बांधकाम परवाने दाखवावे लागणार आहेत.

महापालिका आयुक्तांचे पत्र असे...

विजयपूर रोडवरील नागरिकांनी अनधिकृत बांधकामे, इमारती व रस्त्यावरील अतिक्रमणे काढून किंवा पाडून घ्यावीत. त्यासंदर्भातील कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. तत्पूर्वी या परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास अथवा नुकसान होऊ नये, म्हणून महानगरपालिकेचे कर्मचारी इमारती, बांधकामे तसेच अतिक्रमणाचा सर्व्हे करीत आहेत. सर्व्हे करताना नागरिकांनी त्यांच्याकडे असलेले बांधकाम परवाने दाखवावेत, म्हणजे सर्व्हेचे काम सुकर होण्यास मदत होईल, असे महापालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

मंगळवारपासून होणार सर्व्हे

जुना विजापूर नाका ते ए. जी. पाटील कॉलेज असा विजापूर रोडवरील सर्व्हिस रोड केला जाणार आहे. त्याअनुषंगाने मंगळवारपासून या रोडवरील अनधिकृत बांधकामांचा दुसऱ्यांदा सर्व्हे होणार आहे. विजापूर रोडच्या दुभाजकापासून दोन्ही बाजूंना १५ मीटर अंतरावरील बांधकामांचा हा सर्व्हे असणार आहे.

- प्रमोद गोविंदवार, कनिष्ठ अभियंता, नगररचना विभाग, सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT