महाराष्ट्र बातम्या

सोलापूर टॉवेल उद्योगाचे हब होणार 

सकाळ न्यूज नेटवर्क


मुंबई: वस्त्रोद्योग आणि यंत्रमाग उद्योगाला मंदीमुळे संघर्ष करावा लागत असला तरी टॉवेल उद्योगाने मात्र या क्षेत्राला आशेचा किरण दाखवला आहे. सोलापुरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे टेरी टॉवेलचे उत्पादन होणार आहे. भविष्यात टॉवेल उद्योगाचे हब होण्यासाठी सोलापुरात प्रथमच टेरी टॉवेलशी संबंधित जागतिक व्यापारी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. 

एशिया-पॅसिफिकमध्ये गृह वस्त्र बाजारपेठेत तिसऱ्या क्रमांकाचा वाटा असलेल्या भारताचे 3.7 अब्ज डॉलरची बाजारपेठ होण्याचे लक्ष्य आहे. टॉवेल उद्योगात जवळपास 72 हजार रोजगार आहेत. नुकताच सोलापुरात टेरी टॉवेलविषयक डिजिटल प्रिंटिंगची मशीन जर्मनीहून आणण्यात आली आहे. या मशीनमुळे सोलापुरात जागतिक दर्जाचे "टेरी टॉवेल' उत्पादित होतील, असे "व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्‍स्पो अँड समिट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि "टेक्‍स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन'चे अध्यक्ष राजेश गोस्की यांनी सांगितले. सोलापूर येथे 25 ते 27 सप्टेंबरदरम्यान "व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्‍स्पो अँड समीट' होणार आहे.

या प्रदर्शनामध्ये कापूस उत्पादक ते कापड उत्पादक ते व्यापारी, निर्यातदार आणि आयातदार यांना एकाच व्यासपीठावर आणले जाणार आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी थेट जाळे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. टॉवेल आणि घरातील कपड्यांच्या क्षेत्रांमध्ये जी आव्हाने भेडसावतात त्यांच्यावर उपाययोजनेसंबंधी चर्चाही येथे होणार असल्याचे "समिट'चे उपाध्यक्ष गोविंद झंवर यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT