solapur zp sakal media
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर झेडपीच्या प्राथमिक व माध्यमिकला मिळेना पूर्णवेळ शिक्षणाधिकारी! बिंदुनामावली, शालार्थ आयडीचे विषय रखडले; आमदारांचे आजपासून आंदोलन

सोलापूर झेडपीच्या माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागाला काही महिन्यापासून पूर्णवेळ शिक्षणाधिकाऱ्याची प्रतीक्षा आहे. भास्करराव बाबर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळालेला नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाला काही महिन्यांपासून पूर्णवेळ शिक्षणाधिकाऱ्याची प्रतीक्षा आहे. भास्करराव बाबर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळालेला नाही. मारुती फडकेंची सोलापूरला बदली झाली, पण वैद्यकीय कारण देत काही दिवसांतच ते रजेवर गेले. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच प्रकरणात अडकल्यापासून या विभागाची जबाबदारी प्रभारींच्याच खांद्यावर आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाकडे २० टक्के टप्पा अनुदानावरील ७६ शिक्षकांच्या शालार्थ आयडीचा प्रश्न अजून सुटलेला नाही. माध्यमिक शिक्षण विभागातील आवक- जावक नोंदवह्या गहाळ झाल्याने टप्पा अनुदानावरील २९८ शिक्षकांनाही शालार्थ आयडी मिळालेला नाही. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने बिंदुनामावलीचाही विषय मार्गी लागलेला नाही. असे महत्त्वाचे विषय नवख्या प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनाच हाताळावे लागत आहेत.

दुसरीकडे दोन्ही कार्यालयात जवळपास ५० टक्के कर्मचारी कमी आहेत. दरम्यान, मागच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामाचा त्रास आपल्याला का, हा प्रश्न पडलेले पदभार स्वीकारत नसल्याचेही बोलले जात आहे. कामाचा व्याप, पूर्वीची प्रलंबित किचकट प्रकरणे, ही देखील कारणे त्यासाठी कारणीभूत आहेत.

आता सीईओ मनीषा आव्हाळे यांनी या दोन्ही विभागांवर फोकस करून घडी बसविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, माध्यमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी दोन दिवसांपूर्वी मनुष्यबळ कमी आहे, जुने-अनुभवी लोक नसल्याने काम करताना अडचणी येत असल्याचे गाऱ्हाणे माध्यमांसमोरच मांडले. महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी ‘प्राथमिक’चा विभाग व्यवस्थित हाताळला, पण त्यांनाही आपल्या मूळ विभागाकडे फारसे लक्ष देत नसल्याची खंत आहे.

शिक्षण आयुक्त लक्ष घालतील का?

शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु झाली, तरी सोलापूरची बिंदुनामावली अजून अंतिम झालेली नाही. ‘प्राथमिक’कडे ७६ शिक्षकांच्या शालार्थ आयडीचा विषय प्रलंबित आहे. आता दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांचे नियोजन करावे लागेल, पण ‘माध्यमिक’कडे मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण आयुक्तालयातील एक उपसंचालक व पुणे विभागाच्या उपसंचालकांनी नुकताच सोलापूर दौरा केला. त्यांच्याकडेही दोन्ही विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. पण हा विषय अजून मार्गी लागलेला नाही, हे विशेष.

आजपासून आयुक्तालयासमोर आंदोलनाला सुरवात

टप्पा अनुदानावरील शिक्षकांना तातडीने शालार्थ आयडी द्यावेत, ज्या जिल्ह्यात पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाहीत, ती पदे तत्काळ भरावीत, अशा वेगवेगळ्या विषयांवर पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आजपासून (सोमवारी) मी आंदोलनाला बसणार आहे. लवकरच मागण्यांची पूर्तता होईल, असा विश्वास आहे.

- जयंत आसगावकर, शिक्षक आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT