Solapur zilha parishad

 

Sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेची २७ मार्च रोजी सभापती निवड! मोहोळ, माढा, माळशिरसला मिळणार संधी?, अक्कलकोट, दक्षिण सोलापूरकरांनाही आशा, वाचा...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी शुक्रवारी (ता. २७) होत आहेत. या निवडीमध्ये कोणत्या तालुक्यांना संधी मिळणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे इंद्रजित पवार यांना संधी मिळाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी शुक्रवारी (ता. २७) होत आहेत. या निवडीमध्ये कोणत्या तालुक्यांना संधी मिळणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे इंद्रजित पवार यांना संधी मिळाली आहे. विषय समिती सभापती निवडीत माळशिरस, मोहोळ व माढा तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याला पण संधी मिळणार का? याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

माळशिरस तालुक्यातून भाजपचे दोन सदस्य विजयी झाले आहेत. त्यापैकी संस्कृती सातपुते यांना समाजकल्याण समिती सभापती म्हणून संधी मिळू शकते, अशी सुरवातीपासूनच चर्चा आहे. माळशिरसमध्ये खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात माजी आमदार राम सातपुते यांनी गेल्या महिन्यांपासून कडवा संघर्ष सुरू केला आहे. त्यांच्या या संघर्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेची जोड दिली जाऊ शकते. मोहोळ आणि माढ्यातून सभापतीपदाची कोणाला संधी मिळणार? या बद्दल कमालीची उत्सुकता आहे. वंदना कांबळे यांचे नाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी चर्चेत होते, त्यांना संधी मिळाली नाही. सभापतीपदाची लॉटरी कांबळे यांना लागणार की आणखी कोणत्या सदस्याला लागणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मोहोळमधून विमल खताळ यांचेही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. त्यांना संधी मिळाली नाही, सभापतीपदासाठी खताळ, सचिन जाधव, लखन शिंदे व बालाजी नरोटे यापैकी एकाला निश्चितपणे संधी मिळणार आहे, पण कोणाला? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ व दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामप्पा चिवडशेट्टी यांना अध्यक्षपद मिळेल, अशी तालुक्यात चर्चा झाली, पण त्यांना संधी मिळाली नाही. आता त्यांना सभापतीपदी संधी मिळणार का? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सभापती निवडी भौगोलिक, सामाजिक समतोल राखूनच

जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून भौगोलिक व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल हे निश्चित. आगामी काळातील विधानसभा, लोकसभेचाही विचार यावेळी होईल. दरम्यान, अध्यक्षांचा कालावधी सव्वा वर्षांचा असल्याचे उघड झाल्याने उपाध्यक्ष व भावी सभापतींना किती कालावधी मिळणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

विरोधी पक्षनेत्याबाबत उत्सुकता

जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक नाही. सत्तेचे सुख अनुभवता यावे, यासाठी जिल्हा परिषदेत या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेत्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र दालन असल्याने या पदाची क्रेझ आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वाधिक ५ सदस्य विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेला विरोधी पक्षनेता मिळणार का?, विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची वर्णी लागणार?, की महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही विरोधी पक्षनेताच नसणार, या बद्दलही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वेळापत्रकात बदल! तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचा समावेश; जाणून घ्या तारखा

Pune Nashik Railway Protest: पुणे–मंचर–नाशिक रेल्वेसाठी क्रांतीदिनी रास्ता रोको; अहिल्यानगर मार्गाच्या हालचालीविरोधात तीव्र संताप

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Nimgaon Mhalungi burglary: निमगाव म्हाळुंगीतील रणदिवे वस्तीमध्ये दिवसा घरफोडी; १० लाखांचा सोन्या-रोख ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीती

Farmer Electrocuted: मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे शेतातील मोटार सुरू करताना ३२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

SCROLL FOR NEXT