School  sakal
महाराष्ट्र बातम्या

Solapur News: जिल्ह्यातील 1100 शाळांना कुलूप! 5000 शिक्षक शाळा सोडून 'जुन्या पेन्शन'च्या संपात

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार 795 शाळा असून त्यात नऊ हजार 194 शिक्षक कार्यरत आहेत. आता अंतिम सत्रात जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारल्याने अनेक शाळा शिक्षक नसल्याने बंद ठेवाव्या लागल्या आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार 795 शाळा असून त्यात नऊ हजार 194 शिक्षक कार्यरत आहेत. आता अंतिम सत्रात जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारल्याने अनेक शाळा शिक्षक नसल्याने बंद ठेवाव्या लागल्या आहेत.

पाच हजार शिक्षक संपात असल्याने सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे अकराशे शाळा बंद आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 14 लाखांपर्यंत शासकीय व निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. मंगळवारी हा संप सुरू झाला असून राज्य सरकारने समिती नेमून अभ्यास करून 3 महिन्यात निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली आहे.

2005 मध्ये बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू केल्यावर 2032 नंतर राज्यावर अतिरिक्त बोजा वाढणार आहे. त्यामुळे त्यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. पण, कर्मचारी संपावर ठाम आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन करूनही कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. अनेक शासकीय कार्यालये ओस पडली असून सर्वसामान्यांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे.

त्यातच शाळा बंद राहिल्याने चिमुकल्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल अकराशे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कारण, अनेक शिक्षक संपात सहभागी होत आहेत.

पाच तालुक्यातील सर्वाधिक शाळा बंद

जुन्या पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या बेमुदत संपात करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ व सांगोला या 5 तालुक्यातील सर्वाधिक 850 पेक्षा अधिक शाळा बंद आहेत.

आता आज अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील शाळा बंद होण्याची शक्यता आहे. मुख्याध्यापक, शिक्षक विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय संपात सहभागी झालेल्यांवर कारवाई होऊ शकते. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक बाबी...

  • - जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पाच हजार शिक्षक बेमुदत संपात सहभागी

  • - सोलापूर जिल्ह्यातील 2795 पैकी 1093 शाळा शिक्षक नसल्याने बंद

  • - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक संपावर असल्याने 2 lakh 10 हजार विद्यार्थ्यांपैकी 50 टक्के मुले शाळा सोडून थांबले घरी

  • - बेमुदत संपावर गेलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पाच हजार शिक्षकांपैकी केवळ 178 जणांनीच घेतली पूर्वपरवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT