Gunaratna Sadavarte 
महाराष्ट्र बातम्या

सदावर्तेंना काहीसा दिलासा! सातारा कोर्टाकडून जामीन मंजूर

छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे झाला होता गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

सातारा सत्र न्यायालयानं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर केला आहे, यामुळं सदावर्ते यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा पोलिसांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यामुळं पोलिसांनी त्यांना अटक केली होती. (Some relief to advt Gunaratn Sadavarte Satara court grants bail)

साताऱ्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अॅड. सदावर्ते यांना जमीन मंजूर झाला असून ४ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती. छत्रपती घराण्याबद्दल आक्षपार्ह विधान केल्यामुळे सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि अन्य ११४ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. नुकतीच मुंबई सत्र न्यायालयानं सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पण त्यांच्यामागे चौकश्यांचा ससेमिरा कायम आहे.

कोल्हापूर, सातारा, अकोला अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने विविध प्रकरणांमध्ये चौकशीसाठी त्यांची पोलीस कस्टडी मागण्यात येत आहे. त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल झाल्याने त्या देखील अडचणीत आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT