Beed Tradition Sakal
महाराष्ट्र बातम्या

Beed Tradition : आधी जावयाची गाढवावरुन वरात, मग आदर सन्मान; बीडमधल्या अजब प्रथेबद्दल माहित आहे का?

धुळवडीच्या दिवशी ही प्रथा साजरी केली जाते.

सकाळ डिजिटल टीम

बीड जिल्ह्यामध्ये एक अजब वरात धुळवडीच्या निमित्ताने पाहायला मिळाली. बँड बाजा घेऊन जावयाला गाढवावर बसवून त्याची वरात काढली जात होती. हा या गावच्या परंपरेचा भाग असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यातल्या विडा या गावामध्ये गेल्या ८२ वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. या गावामध्ये होळीनंतर म्हणजे धुळवडीच्या दिवशी गावातल्या नव्या जावयाला गाढवावर बसवलं जातं आणि गावभर त्याची वरात काढली जाते. त्यानंतर जावयासोबत होळी खेळली जाते.

ही परंपरा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या सगळ्यानंतर सोन्याची अंगठी आणि पोशाख देऊन त्याचा सन्मान-सत्कारही केला जातो. आजतकने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी या गावात राहणाऱ्या आनंद देशमुख यांच्या परिवरातल्या एका जावयाने रंग लावून घेण्यास मनाई केली.

तेव्हा त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना रंग लावून घेण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने ऐकलं नाही. मग फुलांनी सजवलेलं एक गाढव आणलं आणि या गाढवावर जावयाला बसवण्यात आलं, गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला आणि गावभर वरात काढण्यात आली.

यानंतर या जावयाला मंदिरात नेण्यात आलं, तिथे त्याला ओवाळलं आणि नवीन कपडे व सोन्याची अंगठी देण्यात आली. तोंडही गोड करण्यात आलं. तेव्हापासून दरवर्षी या गावामध्ये ही प्रथा सुरू आहे. गावामध्ये सध्या २०० पेक्षा अधिक जावई आहेत. दरवर्षी वेगळ्या जावयाची वरात काढली जाते. हा जावई कोणत्याही समाजातला जातीतला असू शकतो. अनेकदा जावई पळून जाण्याचा प्रयत्न करतात, पण गावकरी त्याच्यावर लक्ष ठेवून राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT