Special PMLA Court grants bail to Maharashtra former Home minister anil deshmukh son Salil Deshmukh  esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh Money Laundering Case : मुलगा ऋषिकेशने जामीन अर्ज मागे घेतला; प्रकरणात नवा ट्वीस्ट येणार?

ऋषिकेश देशमुख यांना समन्स बजावूनही ते कधीही ईडीसमोर हजर झाले नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या जवळपास वर्ष-दीडवर्षापासून कारागृहात आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांच्यावर ईडी, सीबीआयने कारवाई केली आहे. अनेकदा त्यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आलेला आहे. याच प्रकरणात आता एक नवा ट्वीस्ट आला आहे.

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यांचंही नाव या प्रकरणात आरोपी म्हणून आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, आता ऋषिकेश यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे. ऋषिकेश देशमुखही या मनी लाँडरिंग प्रकरणातले आरोपी होते. त्यांना ईडीने यापूर्वी समन्सही बजावलं होतं. मात्र ते कधीही ईडीसमोर हजर झाले नाहीत.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

फेब्रुवारी २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडी आढळून आली होती. त्यानंतर घडलेल्या घडामोडींमधून या प्रकरणांचे धागेदोरे मुंबई पोलिसांतले अधिकारी सचिन वाझे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि थेट तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोचले. अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला त्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT