Eknath Shinde Shrikant Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shrikant Shinde : 'अनाथांचा नाथ एकनाथ'नंतर 'आपला श्रीकांत शिंदे'; 'वर्षा'वर होणार गाण्याचं लाँच

यापूर्वी 'अनाथांचा नाथ एकनाथ' हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रभर चांगलंच गाजलं.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांची अवघ्या देशभर चर्चा सुरू झाली. त्याचवेळी अनाथांचा नाथ एकनाथ गाण्याचीही चांगलीच हवा झाली. आता त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही एक नवं गाणं येत आहे.

अनाथांचा नाथ एकनाथ यानंतर आता आपला श्रीकांत शिंदे असं गाणं आज लाँच होत आहे. गायक रोहित राऊत यानं हे गाणं गायलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी या गाण्याचं लाँच होणार आहे.

बाळासाहेबांची शिवसेनाचे सचिव सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून हे गाणं साकारण्यात आलं आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित असलेलं 'अनाथांचा नाथ एकनाथ' हे गाणं प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी गायलं होतं. तर त्यामागे मंगेश देसाई आणि संदीप माळवी यांची संकल्पना होती. हे गाणं महाराष्ट्रभर गाजलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT