महाराष्ट्र बातम्या

तर विद्यार्थी बंदूक घेऊन नक्षलवादी होतील; शेट्टींचा इशारा

अर्चना बनगे

कोल्हापूर : वारंवार परीक्षा जाहिर करून त्या रद्द होणार असतील आणि विद्यार्थ्यांच्या (Student) मानसिकतेशी हे सरकार जर खेळणार असेल तर पुढे जाऊन हातामध्ये वही पुस्तक घेणारे विद्यार्थी बंदूक घेऊन नक्षलवादी कधी बनतील हे सांगता येणार नाही आणि याला जबाबदार हे महाराष्ट्र शासनाच असेल असे मत स्वाभिमानी विद्यार्थी युवा परिषदचे नेते सौरभ शेट्टी (Saurabh Shetty) यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतिने घेण्यात येणारी गट-अ आणि गट-ब प्रभागातील कर्मचाऱ्यांची भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय दिला. यावर राज्यभरात विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. कोल्हापुरातील विद्यार्थी संघटना ही आक्रमक होत आहेत.

काही कंपनी आयटी सेक्टरच्या ब्लॅक लिस्ट मध्ये आहेत. महाराष्ट्र शासनाने ब्लॅक लिस्ट मध्ये असलेल्या न्यासा कंपनीला परीक्षेचे कॉन्ट्रॅक्ट दिलं. याचा पर्दाफाश होणं महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासन आणि न्यासा कंपनी मध्ये कोणती जुगलबंदी सुरू आहे. अशा परिक्षा एमपीएससी विभागाला न देता खाजगी कंपन्यांकडे का दिल्या जातात याची स्पष्टता होणे आता गरजेचे आहे. हे सरकार विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे. असे मत ही त्यांनी व्यक्त केले.

ज्या विद्यार्थ्यांची जिल्हा बाहेर केंद्र आहेत, ज्यांचे घरापासून अंतर हे पन्नास किलोमीटर आहे अशा विद्यार्थ्यांना वाहतुकीचा भत्ता दिला पाहिजे. अशी मागणी सौरभ शेट्टी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT