Soyabean And Cotton Crop Damage Due To Heavy Rain In Maharashtra  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Soyabean And Cotton Crop Damage: पावसाने हाहाकार! शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला; सोयाबीन, कापूस पाण्यात

Soyabean And Cotton Crop Damaged Due To Rain: यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मायबाप सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आशुतोष मसगौंडे

परळी वैजनाथ: गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घातले असून पावसामुळे हाहाकार माजला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. तर सोयाबीनच्या शेंगांची गळती होऊन वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मायबाप सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसामुळे नद्या, नाल्या, ओढे खळाळले असून नदीला आलेल्या पुरामुळे, बीड-परळी व परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे.

परळी बीड रस्त्यावरील वाफ नदीला आलेल्या पुरामुळे तात्पुरता पर्यायी पूल दुसऱ्यांदा वाहून गेला. तर परळी- गंगाखेड मार्गावरील पुलाच्या अर्धवट कामामुळे पुन्हा तिसऱ्यांदा वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान, सध्या सोयाबीन, कापूस शेतकऱ्यांच्या शेतात उभे असून सोयाबीन काढणीसाठी आले आहे. जोरदार पडलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना गळती लागली तर वेचणीसाठी आलेला कापसाच्या पावसामुळे वाती झाल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या नशीबी कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ

१५ दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. त्याचेच पंचनामे पूर्ण झाले नाहीत तर आता पुन्हा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पहिलीच नुकसान भरपाई मिळाली नाही आता दुसऱ्यांदा पडलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. पहिलेच पंचनामे अर्धवट असताना या नुकसानीचे पंचनामे कधी करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतकऱ्यांच्या नशीबी कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ. यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. मागच्या वर्षीचा भावातील फरक म्हणून पाच हजार रुपये शासनाने फरक देण्याचे घोषित केली आहे ते मिळाले नाहीत, अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही. आता हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. याकडे सरकारने लक्ष देवून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT