File photo of Sumitra Mahajan sakal
महाराष्ट्र बातम्या

सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल झाल्याचे वृत्त तथ्यहीन

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी हेच अद्याप आहेत

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : माजी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजभवनमधील सूत्रांनी अशी बदली झाल्याचे नाकारले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी हेच अद्याप आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांना नारळ देऊन त्यांच्या पदावर महाजन यांची नियुक्ती झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक जणांनी महाजन यांच्या छायाचित्राचा वापर करून फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींवर पोस्ट केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजभवनमधील सूत्रांशी संपर्क साधल्यावर, असा कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोश्यारी यांनी 5 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. राज्यपाल पदाची त्यांची कारकीर्द गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या बारा नावांची आमदार पदी त्यांनी नियुक्ती केली नव्हती.

तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना त्यांची राज्य सरकारबरोबर अनेक वेळा चकमक उडाली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने कोश्यारी यांची बदली करावी, अशी मागणी अनेक वेळा केली आहे. महाजन यांचे अनेक नातेवाईक आहेत. तसेच महाराष्ट्रातही त्यांची ये-जा होत असते. राज्यपालपद हे निरपेक्ष असावे असा आजवरचा संकेत आहे. महाजन यांचे नातेसंबंध महाराष्ट्रात असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त करता येणार नाही, असेही काही उच्चपदस्थ राजकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सोशल मीडियावरील राज्यपाल बदलाची पोस्ट ही अफवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation GR : सरकारने मनोज जरांगेना दिलेल्या 'जीआर'मध्ये काय? वाचा संपूर्ण अध्यादेश जसाचा तसा

Latest Marathi News Updates: आज मनोज जरंगे मुंबई सोडणार

Rohit Sharma खूपच बदलला, तब्बल २० किलो वजन केलं कमी; Photo पाहून चाहत्यांनीही केलंय कौतुक

Top Government Jobs September: सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी भरती; आजच करा अर्ज, पहा टॉप १० सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी

Maratha Reservation : आमची उपासमार केली, पण आज ताजसमोर आम्ही जेवणावळी घालतोय! ताज हॉटेल समोरील रस्त्यावर जेवण वाटपासाठी गाड्यांची रांग

SCROLL FOR NEXT